Online-Admission Sakal
एज्युकेशन जॉब्स

Eleventh Admission : अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया गुरुवारपासून

इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी आणि अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया गुरुवारी (ता.२५) सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी आणि अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया गुरुवारी (ता.२५) सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी आणि अर्ज भरणे गुरुवारपासून शक्य होणार आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्याप्रमाणे ही प्रक्रिया प्रत्यक्षात गुरुवारपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांची नोंदणी, अर्जाचा भाग एक भरणे, अर्ज व्हेरिफाय करून घेणे ही प्रक्रिया गुरुवारपासून सुरू होत आहे. तर उच्च माध्यमिक विद्यालयांची नोंदणी, कनिष्ठ महाविद्यालयांनी भरलेली माहिती तपासून शिक्षण उपसंचालकांनी ऑनलाइन प्रमाणित करण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे.

तर, अर्जातील भाग दोन महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाला जाहीर झाल्यानंतर सुरू होणार आहे, अशी माहिती शिक्षण संचालनालयाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT