Online Admission Sakal
एज्युकेशन जॉब्स

Eleventh Admission : तिसऱ्या फेरीत १४,७०८ विद्यार्थ्यांना महाविद्यालये अलॉट

इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या नियमित फेरीची निवड यादी प्रसिध्द झाली असून, पुणे शहरात १४ हजार ७०८ विद्यार्थ्यांना महाविद्यालय अलॉट करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या नियमित फेरीची निवड यादी प्रसिध्द झाली असून, पुणे शहरात १४ हजार ७०८ विद्यार्थ्यांना महाविद्यालय अलॉट करण्यात आले आहे. शिक्षण विभागाने बुधवारी निवड यादी प्रसिद्ध केली. तिसऱ्या फेरीत सर्वाधिक ५ हजार ७५ विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीक्रमानुसार महाविद्यालय मिळाले आहे.

शहरात अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीसाठी ५७ हजार ६१५ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी ४१ हजार २२५ विद्यार्थी पात्र ठरले होते. या विद्यार्थ्यांपैकी १४ हजार ७०८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. आता या विद्यार्थ्यांना १४ जुलैपर्यंत संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल.

कॉलेज लॉगीनमध्ये प्रवेश ऑनलाईन निश्चित करणे, प्रवेश रद्द करणे तसेच प्रवेश नाकारणे या प्रक्रिया सुरू राहतील. कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे विद्यालय अलॉट झालेले आहे, त्यांनी तेथेच प्रवेश घेणे अनिवार्य आहे.

प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही किंवा प्रवेश नाकारला गेला, तर त्यांना पुढील का नियमित फेरीसाठी प्रतिबंधित केले जाईल आणि त्या फेरीनंतरच प्रवेशासाठी त्यांचा विचार केला जाईल. प्रवेश रद्द केलेले विद्यार्थीही पुढील फेरीसाठी प्रतिबंधित केले जातील.

दरम्यान, पहिल्या फेरीत २३ हजार २३४ तर दुसऱ्या फेरीत ९ हजार २६० विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. आता तिसऱ्या फेरीनंतर विशेष फेरीचे आयोजन केले जाणार आहे. कोटा आणि द्विलक्षी जागांवरही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

फेरी - पात्र विद्यार्थी - निवड झालेले - प्रवेश घेतलेले

पहिली फेरी - ६३,४४२ - ४२,२३२ - २३,२३४

दूसरी फेरी - ४४,५४० - २०,६०२ - ९,२६०

तिसरी फेरी - ४१,२२५ - १४,७०८ - --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cheteshwar Pujara Retire: भारताचा 'टेस्ट स्पेशालिस्ट' निवृत्त! पुजाराने केली मोठी घोषणा; म्हणाला, 'प्रत्येक चांगली गोष्ट...'

Latest Marathi News Updates : सांगोला तालुक्यात लांडग्यांचा कहर!

'जर कोणी माझ्यासाठी या दोन गोष्टी केल्या, तर मी आयुष्यात कधीच दक्षिणा घेणार नाही'; बागेश्वर बाबांचे मोठे विधान

Viral Video : महिलेने वाचविलेला जीव, अनेक वर्षांनी दिसताच सिंहांनी मारली मिठी, हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

Thalapathy Vijay चा मेगा ब्लॉकबस्टर शो! Modi च्या सभेपेक्षा जास्त गर्दी, पडद्यावरून थेट मैदानात कसा आला?

SCROLL FOR NEXT