Eleventh Admission sakal
एज्युकेशन जॉब्स

Eleventh Admission : अकरावीच्या तिसऱ्या फेरीसाठी बुधवारपर्यंत पसंतीक्रम नोंदविता येईल

‘कॅप’अंतर्गत आतापर्यंत २८ हजार ५८९ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित

सकाळ वृत्तसेवा

पुणे - अकरावी प्रवेशाच्या नियमित तिसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना बुधवारपर्यंत (ता. १७) महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविता येईल. निवड यादी २२ जुलैला जाहीर होईल व विद्यार्थी २४ जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करू शकतील.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रातील ३३८ उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रवेशाची दुसरी नियमित फेरी नुकतीच संपली. यात १८ हजार ७२३ विद्यार्थ्यांना महाविद्यालये मिळाली. त्यातील आठ हजार २२९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला.

नियमित तिसऱ्या फेरीचा तपशील कार्यवाही : कालावधी : प्रवेश अर्ज भाग-एक संपादित करणे, अर्ज वेळेत लॉक करून प्रमाणित करणे, नवीन विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून अर्जाचा भाग एक आणि भाग दोन भरणे, महाविद्यालयाचा पसंतीक्रम नोंदविणे : १७ जुलैपर्यंत (रात्री दहा वाजेपर्यंत).

अंतर्गत कार्यवाही, गुणवत्ता यादी तयार करणे; तसेच विभागीय कॅप समित्यांकडून ॲलॉटमेंटचे पूर्व परीक्षण : १८ ते १९ जुलै.

विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी मिळालेल्या महाविद्यालयांची निवड यादी प्रदर्शित करणे, लॉगिनमध्ये प्रवेशासाठी मिळालेले महाविद्यालय दर्शविणे, महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची यादी कॉलेज लॉगिनमध्ये दिसणे, कट-ऑफ जाहीर करणे : २२ जुलै (सकाळी १०).

विद्यार्थ्यांनी मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे, प्रवेश रद्द करणे तसेच प्रवेश नाकारणे : २२ ते २४ जुलै

प्रवेशित विद्यार्थ्यांची स्थिती पोर्टलवर नोंदविण्यासाठी महाविद्यालयांना वेळ, महाविद्यालयांनी कोट्यातील रिक्त जागा ‘कॅप’कडे समर्पित करणे : २४ जुलै (रात्री आठ वाजेपर्यंत), पुढील प्रवेश फेरीसाठी रिक्त जागा प्रदर्शित करणे : २५ जुलै

‘कॅप’अंतर्गत जागांचा तपशील

तपशील - आकडेवारी

  • महाविद्यालयांची संख्या - ३३८

  • प्रवेशासाठी उपलब्ध जागा - ८२,५६०

  • आतापर्यंत झालेले प्रवेश - २८,५८९

  • रिक्त जागा - ५५,५९५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay Oath Ceremony : थलपती विजय यांचा शपथविधी १० वाजता, राहुल गांधीसह मान्यवरांची उपस्थिती; ज्योतिषांनी शपथविधीची वेळ बदलली

Mother's Day 2026: ‘मदर्स डे’ची सुरुवात करणारी महिलाच शेवटी त्याच्या विरोधात का उभी राहिली?

साप्ताहिक राशिभविष्य : (१० मे २०२६ ते १६ मे २०२६)

मेष साप्ताहिक राशिभविष्य (१० मे २०२६ ते १६ मे २०२६) : भागीदारीतील अडथळे दूर होणार, करिअरमध्ये नवे मार्ग सापडणार

Sunday Special Breakfast: रविवारी नाश्त्याला बनवा स्पेशल 'पोहा नारियल इडली', पाहा या रेसिपीचा सोपा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT