Eleventh  admission
Eleventh admission sakal media
एज्युकेशन जॉब्स

मंगळवारपासून अकरावी प्रवेशासाठी प्रथम प्राधान्यच्या सात फेऱ्या

संजीव भागवत

मुंबई : अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी (Eleventh online admission) मुख्य प्रवेशाच्या तीन प्रवेश फेरी आणि त्यानंतरच्या विशेष फेरीनंतरही लाखाहून अधिक जागा रिक्त राहिल्याने आता प्रथम येणाऱ्यास प्रथम (FCFS) प्रवेश फेरीसाठी तब्बल सात प्रवेश फेऱ्यांचे आयोजन आले आहे. यासाठीचे वेळापत्रक (timetable) आज शिक्षण विभागाने जारी केले असून मंगळवारी, २८ सप्टेंबरपासून या पहिल्या फेरीला तर सातव्या फेरीला १३ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. यात मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या महानगरक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील हे प्रवेश ऑनलाईन नोंदणीने केले जाणार आहेत.

ज्या महाविद्यालयांमध्ये रिक्त जागा आहेत, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अर्ज करून हे प्रवेश घेता येणार आहेत. पहिल्या फेरीसाठी नोंदणी करण्यासाठी २८ व २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० पासून सायंकाळी ६ या काळात नोंदणी करून या दोन्ही दिवसात संबंधित महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करू शकतील. तर दुसरी फेरी ३० सप्टेंबर ते१ ऑक्टोबर, तिसरी फेरी- २ ते ४ ऑक्टोबर, चौथी फेरी- ५ ते ६ ऑक्टोबर, पाचवी फेरी- ७ ते ९ ऑक्टोबर, सहावी फेरी- १० ते १२ ऑक्टोबर आणि शेवटची एटीकेटीच्या आदी विद्यार्थ्यांसाठी १३ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. यानंतरही रिक्त राहिलेल्या जागांची माहिती शिक्षण विभागाकडून जाहीर केली जाणार असल्याचे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.

एफसीएफएस या सात प्रवेश फेरीत सर्वोच्च न्यायालयाने या प्रवेशासाठी दिलेल्या निर्देशांना हरताळ फासत सर्व व्यवस्थापन कोट्यात रिक्त राहिलेल्या जागांवर संबंधित महाविद्यालयांना प्रवेशाची मुभा मिळणार आहे. शिवाय ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळूनही ते घेतलेले नाहीत, त्यांना हव्या त्या ठिकाणी ऑनलाईन आणि गुणवत्तेचे निकष पायदळी तुडवून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर प्रवेश दिले जाण्‍याची शक्यता असल्याने यावर बहुजन विद्यार्थी संघटनेसोबत शिक्षण तज्ज्ञांनी आक्षेप घेतले आहेत.

अशा आहेत राज्यभरातील रिक्त जागा

अमरावती ७,०३३

मुंबई १,३६,०३९

नागपूर २९,९४१

नाशिक ८,८३५

पुणे ५२,२८७

एकुण २,३४,१३५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

SCROLL FOR NEXT