police recruitment  Google
एज्युकेशन जॉब्स

पोलिस भरतीसाठी महत्वाची बातमी, 'ही' माहिती अपडेट न केल्यास रद्द होणार अर्ज

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पोलिस भरती-२०१९ (police recruitment) साठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे ई-मेल आयडी (email id) आता नव्याने अपडेट करावे लागणार आहेत. त्यासंबंधातील सूचना स्वतः पोलिस महासंचालकांनी दिल्या आहेत. त्यानुसार उमेदवारांना 'www.mahapolice.gov.in ' या संकेतस्थळावर हे मेल आयडी अपडेट करावे लागतील.

उमेदवारांना पासवर्ड व विकल्प निवडण्याबाबत कळविले होते. पासवर्ड सर्वांनी बदलणे गरजेचे आहे. अन्यथा भरती प्रक्रियेत त्यांचे आवेदनपत्र रद्द ठरू शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. एसईबीसी उमेदवारांना अराखीव, खुला किंवा इतर विकल्प देणे गरजेचे आहे. ई-मेल आयडी विसरले किंवा अन्य कारणास्तव गहाळ झाल्याच्या तक्रारी काही उमेदवारांकडून या कार्यालयाकडे आल्या आहेत. अशा उमेदवारांना ई-मेल अपडेट करण्यासाठी तसेच विकल्प देण्याठी २२ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.

उमेदवारांनी पोलिस भरती-२०१९ वर क्लिक करून घटकनिहाय संकेतस्थळावर जाऊन विकल्प द्यावा. अथवा ई-मेल आयडी व पासवर्ड बदल करून घ्यावा, असे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजयकुमार यांनी कळवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT