Exam Dates
Exam Dates google
एज्युकेशन जॉब्स

Exam Dates : JEE, CUET आणि NEET परीक्षेच्या तारखा जाहीर; असे पाहा वेळापत्रक

नमिता धुरी

मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने JEE, NEET इत्यादी परीक्षांसाठी शैक्षणिक कॅलेंडर जाहीर केले आहे. NTA ने त्यांच्या वेबसाईटवर कॅलेंडर (NTA Exam Calendar 2023) बद्दल माहिती दिली आहे.

जे विद्यार्थी 2023 मध्ये या स्पर्धा परीक्षांना बसणार आहेत ते अधिकृत वेबसाइट nta.ac.in वर जाऊन वेळापत्रक तपासू शकतात. NTA ने राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा UG, कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा तसेच संयुक्त प्रवेश परीक्षेचे शैक्षणिक कॅलेंडर जाहीर केले आहे. हेही वाचा - काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

यासोबतच NTA ने JEE मुख्य परीक्षेसाठी (JEE Main Exam 2023) ऑनलाइन नोंदणीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत, त्यानुसार विद्यार्थी 19 डिसेंबर 2022 ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत नोंदणी करू शकतात.

महत्वाच्या तारखा..

JEE 2023 सत्र 1 - 24, 25, 27, 28, 29, 30, 31 जानेवारी 2023

JEE 2023 सत्र 2- 6,7,8,10, 11, 12 एप्रिल 2023

NEET UG 2023 - 7 मे 2023

CUET 2023 - 21 मे ते 31 मे 2023

NTA परीक्षा कॅलेंडर 2023 परीक्षेच्या तारखा तपासण्यासाठी या गोष्टी करा.

१. - शैक्षणिक कॅलेंडर तपासण्यासाठी, सर्वप्रथम NTA च्या अधिकृत वेबसाइट nta.ac.in वर जा.

२. - दुसऱ्या स्टेपमध्ये वेबसाइटच्या होमपेजवरील ताज्या बातम्या विभागात जा.

३. - ताज्या बातम्यांच्या विभागावरील शैक्षणिक कॅलेंडरच्या लिंकवर क्लिक करा.

४. - लिंकवर क्लिक केल्यानंतर महत्त्वाच्या परीक्षांचे कॅलेंडर स्क्रीनवर दिसेल.

५. - आता ते तपासा आणि भविष्यासाठी हार्ड कॉपी देखील ठेवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT