Students_Exam
Students_Exam esakal
एज्युकेशन जॉब्स

'अंतिम' वर्षातील परीक्षा ऑफलाइन! द्वितीय, प्रथम वर्षाला ऑनलाइन संधी

तात्या लांडगे

केवळ अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचीच परीक्षा ऑफलाइन तर द्वितीय व प्रथम वर्षातील ऑप्शनल विषयांची परीक्षा ऑनलाइन घेण्याचे नियोजन विद्यापीठांनी सुरू केले आहे.

सोलापूर : कोरोनाचा (Covid-19) प्रादुर्भाव अजूनही पूर्णपणे संपला नसून आता नव्याने 'ओमिक्रोन' (Omicron) हा व्हेरिएंट आला आहे. तर दुसरीकडे 18 वर्षांवरील विशेषत: महाविद्यालयातील बहुतेक विद्यार्थ्यांनी प्रतिबंधित लस टोचलेली नाही. बहुतेक विद्यापीठांच्या (University) सत्र परीक्षा (Exams) डिसेंबर-जानेवारीत होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर केवळ अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचीच परीक्षा ऑफलाइन तर द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थ्यांची आणि प्रथम वर्षातील ऑप्शनल विषयांची परीक्षा ऑनलाइन घेण्याचे नियोजन विद्यापीठांनी सुरू केले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील दहा लाख व्यक्‍तींनी अजूनही कोरोनावरील प्रतिबंधित लस घेतलेली नाही. चिंतेची बाब म्हणजे लस न टोचणाऱ्यांमध्ये सर्वाधिक तरुण आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ऑक्‍टोबरअखेरीस ऑफलाइन कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी 'मिशन यूथ हेल्थ' राबविले. दुसरीकडे महाविद्यालयातील उपस्थितीसाठी दोन डोसचे बंधनही घातले. मात्र, बहुतेक विद्यार्थ्यांनी लस टोचलीच नाही. संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत हेच विद्यार्थी कोरोनाचे कॅरिअर्स ठरतील, असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे विद्यापीठांनी परीक्षांच्या नियोजनात लवचिकता ठेवली आहे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सत्र परीक्षा जानेवारी 2022 मध्ये होणार आहे. त्यावेळी अंतिम तथा तृतीय वर्षाची परीक्षा ऑफलाइन तर प्रथम वर्षात जे विषय अनिवार्य आहेत, त्या विषयांच्या परीक्षाही ऑफलाइन घेण्याचे निश्‍चित झाले आहे. तर द्वितीय वर्ष आणि प्रथम वर्षाच्या पर्यायी विषयांची परीक्षा ऑनलाइन घेता येईल, यासंदर्भात नियोजन सुरू आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थी लसीपासून दूरच

कोरोनावरील प्रतिबंधित लसीकरण 16 जानेवारीपासून सुरू झाले. जिल्ह्यात 18 ते 45 वयोगटातील 19 लाख तरुणांपैकी 12 लाख 80 हजार तरुणांनीच लसीचा पहिला डोस घेतला आहे. पहिला डोस घेतलेल्यांपैकी जवळपास तीन लाख तरुणांनीच दुसरा डोस घेतला आहे. मात्र, कोवॅक्‍सिन लसीचा पहिला डोस घेऊन 28 दिवस तर कोविशिल्ड लस घेऊन 84 दिवसांचा कालावधी पूर्ण होऊनही लस न घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. लस न घेतलेल्यांना महाविद्यालयात येण्यास बंदी घालूनही तरुण लस घेत नसल्याने आगामी सत्र परीक्षा ऑनलाइन होईल, अशी माहिती विद्यापीठातील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

डिसेंबरमध्ये 'बॅकलॉग'ची विशेष परीक्षा

अंतिम वर्षात प्रवेश घेण्यापूर्वी प्रथम वर्षातील अनुत्तीर्ण विषयात उत्तीर्ण होणे आवश्‍यक आहे. प्रथम वर्षातील अनुत्तीर्ण विषयांमुळे ज्या विद्यार्थ्यांचे अंतिम वर्षाचे प्रवेश अडकून पडले ओहत, त्यांच्यासाठी डिसेंबरमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे. 10 डिसेंबरपासून ही परीक्षा सुरू होईल, अशी माहिती तत्कालीन प्र-कुलगुरू डॉ. विकास कदम यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Chennithala : मतदारांचा कल ‘इंडिया’ आघाडीकडे

Loksabha Election 2024 : मोदी, ठाकरे, गांधी, पवार यांचीच हवा

Election Commission : निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानस्नेही कारभाराला प्राधान्य

Devendra Fadnavis : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग नगरपर्यंत नेणार

Success Story : पोरीची जिद्दच लय मोठी! अपघातात हात गमावला तरी अनामता डगमगली नाही, बोर्डात मिळवले ९२ टक्के मार्क्स

SCROLL FOR NEXT