Eleventh Admission sakal
एज्युकेशन जॉब्स

Eleventh Admission : अकरावीत पहिल्या विशेष फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे - राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होत असल्याने शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीसाठी कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेता येत नाही. त्यामुळे इयत्ता अकरावीच्या पहिल्या विशेष फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ आली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत ही प्रक्रिया सुरू आहे.

प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित फेऱ्या झाल्या असून सध्या पहिली विशेष फेरी सुरू आहे. या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ही मुदतवाढ दिली असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay Oath Ceremony : थलपती विजय यांचा शपथविधी १० वाजता, राहुल गांधीसह मान्यवरांची उपस्थिती; ज्योतिषांनी शपथविधीची वेळ बदलली

Mother's Day 2026: ‘मदर्स डे’ची सुरुवात करणारी महिलाच शेवटी त्याच्या विरोधात का उभी राहिली?

साप्ताहिक राशिभविष्य : (१० मे २०२६ ते १६ मे २०२६)

मेष साप्ताहिक राशिभविष्य (१० मे २०२६ ते १६ मे २०२६) : भागीदारीतील अडथळे दूर होणार, करिअरमध्ये नवे मार्ग सापडणार

Sunday Special Breakfast: रविवारी नाश्त्याला बनवा स्पेशल 'पोहा नारियल इडली', पाहा या रेसिपीचा सोपा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT