SSC HSC Exam Sakal
एज्युकेशन जॉब्स

SSC-HSC Exam : खासगी विद्यार्थ्यांना दहावी-बारावीच्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फॉर्म नंबर १७ भरून दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्कासह अर्ज करण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फॉर्म नंबर १७ भरून दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्कासह अर्ज करण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

खासगी विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाइनद्वारेच भरायचा आहे. कोणाचाही अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी दहावीकरिता ‘http://form17.mh-ssc.ac.in’ आणि बारावीकरिता ‘http://form17.mh-hsc.ac.in’ या संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी आणि इंग्रजीमधून उपलब्ध आहेत.

खासगी विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्काने नावनोंदणी करण्यासाठी अंतिम मुदत २० डिसेंबर असणार आहे. त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही, असे राज्य मंडळाचे प्रभारी सचिव माणिक बांगर यांनी प्रकटनाद्वारे जाहीर केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT