MHT-CET  esakal
एज्युकेशन जॉब्स

MHT-CET अर्जाची 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

अरुण मलाणी

नाशिक : इयत्ता बारावीनंतर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्‍या पदवी अभ्यासक्रमासाठी एमएचटी-सीईटी (MHT-CET) परीक्षेद्वारे प्रवेश दिले जाणार आहेत. या परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे. त्‍यानुसार आता विद्यार्थ्यांना १५ एप्रिलपर्यंत संकेतस्‍थळावर ऑनलाइन स्वरूपात नोंदणी करता येणार आहे.

राज्‍यस्‍तरावर MHT-CET परीक्षा महत्त्वाची

सध्या इयत्ता बारावीच्‍या परीक्षा अंतिम टप्‍यात असून, विविध प्रवेश परीक्षांच्‍या तयारीला विद्यार्थी लागले आहेत. अशात राज्‍यस्‍तरावर एमएचटी-सीईटी ही परीक्षा महत्त्वाची आहे. या परीक्षेच्‍या माध्यमातून बी.ई., बी.फार्मसी आणि बी.एस्सी (कृषी) या अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्षात प्रवेश दिले जाणार आहेत. अशात पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन स्वरूपात अर्ज मागविले होते. पहिल्‍या टप्‍यातील मुदत काल (ता.३१) संपत असताना, नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय सीईटी सेलतर्फे घेतला आहे. त्‍यानुसार आता पात्र विद्यार्थ्यांना १५ एप्रिलपर्यंत ऑनलाइन स्वरूपात संकेतस्‍थळावर अर्ज भरता येतील. पाचशे रुपये इतक्‍या विलंब शुल्‍कासह ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १६ ते २३ एप्रिल अशी मुदत असणार आहे.

प्रमाणपत्रे तयार ठेवण्याच्‍या सूचना

दरवर्षी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी मोठी गर्दी होत असते. अशात प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्‍यानंतर प्रमाणपत्राअभावी गोंधळ निर्माण होत असतो. ही गोष्ट लक्षात घेता जात वैधता प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र व यांसह प्रवेशासाठी लागणारे कागदपत्रे विद्यार्थ्यांनी तयार ठेवण्याच्‍या सूचना सीईटी सेलतर्फे दिल्‍या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Female Doctor: साताऱ्यातील महिला डॉक्टरची आणि पोलिसाची ओळख कशी झाली? गुन्ह्यातील 'तो' दुसरा आरोपी कोण? मोठी माहिती समोर

Jr Hockey World Cup: पाकिस्तानची आशिया कपपाठोपाठ भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपमधूनही माघार! बदली संघाची होणार घोषणा

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात बंद; सेन्सेक्स 340 अंकांनी खाली, कोणते शेअर्स घसरले?

सायली-अर्जुनापेक्षा हटके आहे Reel Life सासूची खरी लव्हस्टोरी ! वर्षभर पाहिलेली होकाराची वाट

'महागठबंधन'मध्ये मुकेश साहनींना उपमुख्यमंत्रीपद देण्यामागं नेमकं कारण काय? काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाला वगळून साहनींवर का विश्वास ठेवला?

SCROLL FOR NEXT