Pune University Sakal
एज्युकेशन जॉब्स

Pune University : पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांना मुदतवाढ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीच्या आवारातील (कॅम्पस) विविध विभागांमध्ये चालविल्या जाणाऱ्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी मंगळवारपर्यंत (ता. २०) मुदतवाढ देण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीच्या आवारातील (कॅम्पस) विविध विभागांमध्ये चालविल्या जाणाऱ्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी मंगळवारपर्यंत (ता. २०) मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे बारावीनंतरच्या अभ्यासक्रमांचा शोध घेणारे विद्यार्थी विलंब शुल्कासह अजुनही अर्ज करू शकतात.

विद्यापीठाच्या आवारातील विविध विभागांमध्ये मिळून एकुण १७ पदवीपातळीवरचे अभ्यासक्रम चालविले जातात. या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता बारावी अशी आहे.

यामध्ये बीटेक एव्हिएशन, बीए लिबरल आर्टस्, बीएस्सी ब्लेंडेड, बीबीए हॉस्पिटॅलिटी अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट, बीएस्सी डेटा सायन्स, बीएस्सी ३डी अँनिमेशन अँड व्हीएफएक्स, बॅचलर ऑफ फाईन आर्टस्- पेन्टींग, बँचलर ऑफ आर्टस्- अप्लाईड आर्टस्, बी व्होक मॅन्युफॅक्चरींग स्कील्स, रिन्युएबल एनर्जी, रिटेल मॅनेजमेंट या पदवीपातळीवरील अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

याशिवाय, नृत्य, संगीत, नाटक, बुद्धीस्ट स्टडीज व पाली या विषयातले बारावीनंतरचे पाच वर्षांचे एकात्मिक एम ए अभ्यासक्रम तसेच बायोटेक्नॉलॉजी विषयातील पाच वर्षांचा एसएस्सी अभ्यासक्रम यांचाही यात समावेश आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या प्रवेश विभागाचे उपकुलसचिव राजेश राहेरकर यांनी दिली.

पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा शनिवारी (ता. २४) होणार होती. त्याऐवजी आता ही परीक्षा रविवार २५ जून रोजी प्रॉक्टर्ड पद्धतीने घेण्यात येईल. त्यामुळे ही परीक्षा विद्यार्थी त्यांच्या डिजिटल उपकरणांवर घरी बसूनही देऊ शकतील असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: विद्यार्थ्यांच्या नव्हे, राहुल यांच्या आंदोलनाला ‘नौटंकी’ म्हटले; चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण

Maharashtra Weather : कमी दाबाचा पट्टा सक्रिय पण महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार; पुढच्या चार दिवसांचा हवामान अंदाज असा

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ashadhi Ekadashi 2026 Marathi Wishes: "अवघा रंग एक झाला..." आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा विठ्ठलभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT