Pavitra Portal sakal
एज्युकेशन जॉब्स

Teacher Recruitment : शिक्षक भरतीसाठी सर्व व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची सुविधा पवित्र पोर्टलवर उपलब्ध

गेल्या काही वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात सोमवारी केली.

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे - गेल्या काही वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात सोमवारी केली. त्यानंतर तातडीने शिक्षण विभागाने २०२३ मधील शिक्षक भरतीसाठी सर्वच व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची सुविधा पवित्र पोर्टलवर उपलब्ध करून दिली आहे.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक, शिक्षक पदभरतीसाठी राज्य सरकारने ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२’ ही परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्च२०२३ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने घेतली.

या चाचणीत दोन लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नोंदणी केली. त्यापैकी दोन लाख १६ हजार ४४३ उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली. आतापर्यंत एक लाख ६२ हजार ५६२ उमेदवारांनी स्व: प्रमाणपत्र पूर्ण केले आहे. ही चाचणी दिलेल्या उमेदवारांचे स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे.

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूर येथील खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली.

२०२३ मधील शिक्षक पदभरतीसाठी सर्वच व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची सुविधा पोर्टलवर सुरू केली आहे. त्यासाठी आवश्यक ‘युजर मॅन्युअल’ पोर्टलवर उपलब्ध आहे. सद्यःस्थितीत राज्यातील २३ जिल्हा परिषदांची बिंदूनामावली प्रमाणित झालेली आहे. उर्वरित जिल्हा परिषदांची बिंदूनामावली लवकरच उपलब्ध होईल. दरम्यान शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी व्यवस्थापनांनी बिंदू नामावली अद्ययावत करणे आवश्यक आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

२०१९ मधील शिक्षक पदभरतीच्या वेळी अपात्र, गैरहजर, रुजू न झालेल्या, तसेच माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे रिक्त जागांसाठी गुणवत्तेनुसार उर्वरित पात्र उमेदवार यांच्यातून शिफारस करण्यासाठी पोर्टलवर रिक्त पदांची माहिती देण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना २० ऑक्टोबरपासून सुविधा दिली जाईल.

त्यानंतर स्व प्रमाणपत्र पूर्ण असलेल्या उमेदवारांकडून १० नोव्हेंबरपासून प्राधान्यक्रम घेऊन उर्वरित पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. २०१९मधील जाहिरातीपैकी १९६ व्यवस्थापनांना मुलाखतीसह पद भरतीसाठी उमेदवार उपलब्ध करून देण्यात आले होते, त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पूर्ण झाल्याने त्यांना निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोर्टलवर इंटरव्ह्यू रिझल्ट नोंद करण्याची, तसेच शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट सुविधा उपलब्ध केली आहे.

सर्व व्यवस्थापनांना पदभरतीची जाहिरात देण्याचे आवाहन

‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२’ या चाचणीनुसार शिक्षक पदभरतीची जाहिरात देण्यासाठी संबंधित व्यवस्थापनांनी ‘https://tait2022.mahateacherrecruitment.org.in’ या संकेतस्थळावर भेट द्यावी. या पोर्टलवरील ‘युजर मॅन्युअल’नुसार कार्यवाही करावी. याबाबत व्यवस्थापनांना अडचण असल्यास ‘edupavitra2022@gmail.com’ या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT