Food technology  sakal
एज्युकेशन जॉब्स

लक्षावधी नोकऱ्या देणारे ‘फूड टेक्नोलॉजी’

भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात खाणपानामध्येही मोठ्या प्रमाणात विविधता दिसून येते. त्यामुळे

मंगेश गोमासे - सकाळ वृत्तसेवा

भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात खाणपानामध्येही मोठ्या प्रमाणात विविधता दिसून येते. त्यामुळे या क्षेत्रातही करिअरसाठी करण्यासाठी ‘फूड टेक्नोलॉजी’ या क्षेत्रात चांगला पर्याय उपलब्ध आहे.

फूड टेक्नॉलॉजी हा कुकिंग कोर्स नसून सायन्स, इंजिनिअरिंग व टेक्नोलॉजी याचे सर्वोत्तम मिश्रण आहे. भारतातील अन्नप्रक्रिया उद्योगातील संधी वाढत आहेत. देशातील अन्नधान्याच्या किरकोळ बाजाराची उलाढाल प्रचंड असून दरवर्षी अन्नप्रक्रिया उद्योगात लक्षणीय वाढ होत आहे.

भारत सरकारचे धोरण हे कृषी क्षेत्र आणि उद्योग क्षेत्रासाठी नेहमीच अनुकूल असल्याने या क्षेत्रात वाढ होणार आहे. फळ आणि भाजीपाला उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. असोचेम आणि ग्रँट थॉर्नटर्न या उद्योग संघटनांनी केलेल्या अभ्यासात अन्नप्रक्रिया उद्योगात लाखो रोजगार उपलब्ध होतील, असे दिसून आले आहे.

आवश्यक कौशल्य

  • अन्न विज्ञानाचे पूर्ण ज्ञान

  • उत्पादन प्रक्रियेची माहिती

  • विश्लेषणात्मक आणि गणिताचे ज्ञान

  • खाद्यपदार्थांचा अभ्यास

  • संगणक हाताळणी

  • नवीन तंत्रज्ञानाचे ज्ञान

  • संवाद कौशल्य

  • वैज्ञानिक तर्क आणि विश्लेषण

  • आरोग्य आणि पोषणाची योग्य समज

  • ग्राहकांच्या प्राधान्यांबद्दल जागरूकता

  • तांत्रिक नैपुण्य

प्रशिक्षण देणाऱ्या संस्था

  • राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था (NIFTEM), दिल्ली

  • एमआयटी एडीटी विद्यापीठ

  • हार्काट बटलर टेक्निकल युनिव्हर्सिटी, कानपूर

  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी

  • लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर

  • जामिया हमदर्द विद्यापीठ, दिल्ली

  • गौतम बुद्ध विद्यापीठ, दिल्ली

  • गलगोटिया विद्यापीठ, नोएडा

  • लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, चंदीगड

रोजगार देणारी क्षेत्रे

अन्न उत्पादन, अन्न सुरक्षा, अन्न विश्लेषण, मद्यनिर्मिती, तृणधान्ये आणि बेकिंग, दुग्धजन्य पदार्थ, अन्न मिश्रित पदार्थ, उत्पादन विकास

येथे आहे संधी

  • सरकारी क्षेत्रात कृषी खाते

  • फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन

  • फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

  • सरकारी विभाग

  • मॉल्स

  • हॉस्पिटल

  • हॉटेल्स

  • जिम

  • क्वालिटी कंट्रोलर

  • डाएटेशियन

  • औषध प्रशासन (फूड इन्स्पेक्टर)

  • भारतीय खाद्य निगम यासारख्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर,काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT