ugc sakal
एज्युकेशन जॉब्स

Foreign Degrees : परदेशी पदवीला आता भारतातही मान्यता; युजीसीकडून मसुदा प्रसिद्ध

विद्यापीठ अनुदान आयोगाने परदेशी संस्थांकडून मिळवलेल्या पदवीच्या समकक्षतेबाबत नियम आणि मानकांचा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा नुकताच प्रसिध्द झाला.

सम्राट कदम

पुणे - परदेशी विद्यापीठाच्या पदव्यांना आता भारतातही मान्यता असणार आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) परेदेशी संस्थांकडून मिळवलेल्या पदवी आणि ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षणांतर्गत मिळवलेल्या पदव्यांना मान्यता देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रसिध्द केली आहेत. मात्र, वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र, नर्सिंग, विधी आणि आर्किटेक्चर या अभ्यासक्रमांना या नियमातून वगळण्यात आले आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने परदेशी संस्थांकडून मिळवलेल्या पदवीच्या समकक्षतेबाबत नियम आणि मानकांचा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा नुकताच प्रसिध्द झाला. आयोगाने येत्या १६ सप्टेंबरपर्यंत शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांकडून यासंदर्भात सूचना मागावल्या आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मधील तरतुदी अंतर्गत भारतीय शिक्षण पद्धतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता देण्यासाठी युजीसीने हा पुढाकार घेतला आहे.

परदेशी उच्च शिक्षण संस्थेतून प्राप्त केलेली पदवी केवळ भारतातच मान्यता प्राप्त आणि समतुल्य असेल. मात्र विद्यार्थ्यांनी ज्या परदेशी संस्थेतून पदवी घेतली असेल त्या संस्थेला त्या देशाच्या उच्च शिक्षण समितीची मान्यता असणे आवश्यक आहे, असे युजीसीने आपल्या मसुद्यात म्हटले आहे.

तसेच ऑनलाइन अभ्यासक्रम,परदेशी संस्थांमधील दूरस्थ शिक्षण पद्धती, फ्रेंचायझी मॉडेल संस्थांद्वारे ऑफर केलेले अभ्यासक्रम आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना युजीसीने या नियमातून वगळले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT