Ganesh Chaturthi Schools Holiday Karnataka Government esakal
एज्युकेशन जॉब्स

Ganeshotsav 2023 : गणेश चतुर्थीची शाळांना सुटी जाहीर, कधीपर्यंत शाळा बंद राहणार? शिक्षण विभागानं दिली महत्त्वाची अपडेट

काही दिवसांपासून गणेशोत्सवाची सुटी सोमवारी की मंगळवारी याबाबत संभ्रम होता.

सकाळ डिजिटल टीम

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सायंकाळी सर्व मुख्याध्यापकांना संदेश पाठवून सोमवारी (ता. १८) शाळांना सुटी असल्याची माहिती दिली.

बेळगाव : गणेशोत्सवाची (Ganeshotsav) सुटी एक दिवस अगोदर दिल्यामुळे विद्यार्थ्यांसह शाळांची (School) अडचण झाली आहे. काही दिवसांपासून गणेशोत्सवाची सुटी सोमवारी की मंगळवारी याबाबत संभ्रम होता; मात्र शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवाची सुटी सोमवारी जाहीर (Karnataka Government) केली होती.

त्यानंतरही सुटीत बदल केला जाईल, अशी अपेक्षा होती; मात्र शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सायंकाळी सर्व मुख्याध्यापकांना संदेश पाठवून सोमवारी (ता. १८) शाळांना सुटी असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण होणार असल्याने अनेक शाळांनी गणेशोत्सवादिवशी स्थानिक सुटी जाहीर केली आहे.

दरवर्षी ऋषीपंचमीदिवशी शाळांना स्थानिक सुटी देतात. बेळगाव शहर (Belgaum), तालुका आणि ग्रामीण भागात ऋषीपंचमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्यामुळे बुधवारी (ता. २०) शाळा सुरू राहिल्या तरी विद्यार्थी शाळेत येणार नाहीत.

त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी राहण्याची शक्यता आहे. अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे सुटीच्या तारखेत बदल करावा, अशी मागणी केली होती; मात्र आपल्या हातात काही नाही, सरकार बदल करू शकते, असे सांगत चालढकल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court : म्हशीचे मांस सांगून गोमांस विकले? फॉरेन्सिक रिपोर्टनंतर हायकोर्टाचा संताप, कोर्टात नेमकं काय घडलं?

Republic Day 2026: यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफिस अन् शाळा सजवा इको-फ्रेंडली पद्धतीने आणि द्या नवा लुक

Hasan Mushrif : ‘इतिहास निर्माण होईल असा विजय घडवा’; कागलमधून हसन मुश्रीफ यांचे रणशिंगनाद

पाकिस्तानात लग्नमंडपात आत्मघाती हल्ला; ७ जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

Agriculture News : नाशिकमध्ये 'लाल' कांद्याचा धमाका! ५० हजार हेक्टरने क्षेत्र वाढले, पण भाव पडल्याने शेतकरी चिंतेत

SCROLL FOR NEXT