Online Form Sakal
एज्युकेशन जॉब्स

अल्पसंख्याक समाजातील मुलींनी राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करावे

केंद्र सरकारच्या इयत्ता नववी ते बारावीत शिक्षण घेत असलेल्या अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठीच्या बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी यंदापासून ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

केंद्र सरकारच्या इयत्ता नववी ते बारावीत शिक्षण घेत असलेल्या अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठीच्या बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी यंदापासून ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.

पुणे - केंद्र सरकारच्या (Central Government) इयत्ता नववी ते बारावीत शिक्षण (Education) घेत असलेल्या अल्पसंख्याक समाजातील (Minority Communities) मुलींसाठीच्या (Girls) बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी (National Scholarship) यंदापासून ऑनलाईन अर्ज (Online Form) करावे लागणार आहेत. यासाठी इच्छुक असलेल्या मुलींना राष्ट्रीय शिष्यवृत्ती संकेतस्थळावर (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल) अर्ज करणे आवश्‍यक आहे. यानुसार इयत्ता नववी व दहावीच्या वर्गातील मुलींना प्रतिवर्षी प्रत्येकी पाच हजार रुपये तर, अकरावी व बारावीच्या वर्गातील मुलींसाठी सहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्ती योजनेची राज्याच्या अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयामार्फत अंमलबजावणी केली जाणार आहे.

यासाठी राज्याचे अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालक दिनकर पाटील यांची राज्य समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सरकारची मान्यता असलेल्या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधून इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या धार्मिक अल्पसंख्याक समाजातील (मुस्लिम ,ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारशी व जैन) मुली यासाठी पात्र आहेत.

अल्पसंख्याक समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील मुलींचे शिक्षण आर्थिक कारणांमुळे शिक्षण अपूर्ण राहू नये, हा या शिष्यवृत्तीचा उद्देश आहे. यासाठी इच्छुक असलेल्या मुली या धार्मिक अल्पसंख्याक समाजातील असणे आणि मागील वर्षीच्या वर्गात किमान ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे. याशिवाय पालकांचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी असावे लागते. एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन विद्यार्थिनींना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येतो, असे शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

दरम्यान,सन २०२१-२२ मध्ये या शिष्यवृत्तीसाठी राज्यभरातून ४८ हजार ५५५ अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी ४५ हजार ५४० अर्जांची पडताळणी झाली आहे. या योजनेतील अटींची पुर्तता न करणारे, अपूर्ण स्वरूपातील आणि कागदपत्रांची पूर्तता न झालेले अर्ज नाकारण्यात आल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

या शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र

  • मागील वर्षीचे गुणपत्रक

  • आधार कार्ड

  • बँक पासबुक प्रत

  • अल्पसंख्याक असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र

  • बोनाफाईड सर्टिफिकेट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT