foreign education google
एज्युकेशन जॉब्स

शिक्षणासाठी परदेशात जाताय ? शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना काय काळजी घ्याल ?

या शिष्यवृत्त्यांसाठी अर्ज करताना कोणती काळजी घ्यावी हे पाहू या....

नमिता धुरी

मुंबई : परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. काहींची इच्छा पूर्ण होते तर काहींची नाही होत. परदेशी शिक्षण हे बरेचसे महागडे असल्याने विविध शिष्यवृत्त्यांचा आधार घ्यावा लागतो. या शिष्यवृत्त्यांसाठी अर्ज करताना कोणती काळजी घ्यावी हे पाहू या....

स्ट्राँग प्रोफाईल बनवा

शिष्यवृत्तीसाठी शैक्षणिकदृष्ट्या तुम्ही सक्षम असणे आवश्यक असते. पदव्युत्तर पदवी घ्यायची असल्यास जीपीए ७ असणे जास्त चांगले मानले जाते. एवढेच नाही तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना तुमचे प्रोफाईल स्ट्राँग असेल याची काळजी घ्या. तुमच्या अतिरिक्त कलाकौशल्याच्या प्रशिक्षणाविषयी माहिती द्या.

विद्यापीठ शिष्यवृत्तीच्या पुढील विचार करा

परदेशी शिक्षणासाठी केवळ विद्यापीठेच शिष्यवृत्ती देतात असे नाही. काही सरकारी आणि खासगी संस्थाही अशाप्रकारे शिष्यवृत्ती देतात. तुम्ही भारतात असाल तर टाटातर्फे परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. तुम्ही परदेशात असला तर ते देशही परदेशी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवतात. याची माहिती दोन्ही देशांच्या शिक्षण विभागाकडून मिळू शकते.

प्रवेश घेण्याच्या आधी अर्ज करा

अर्ज केल्यानंतर कागदपत्र तपासणीसाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे तुमचा अभ्यासक्रम सुरू होण्याच्या १८ महिने आधी अर्ज करायला सुरुवात करा. यामुळे वेळेत शिष्यवृत्ती मिळू शकेल.

अॅप्लिकेशन रिव्ह्यू करा

अर्जाचे पुनर्परीक्षण करा जेणेकरून त्यातील कमतरता लक्षात येतील. आपला अर्ज एखाद्या जबाबदार माणसाला दाखवा.

खरी माहिती द्या

अर्ज करताना खरी माहिती द्या. तुम्ही स्वत:ची प्रगती करण्यासाठी परदेशात जाता त्यामुळे अर्जामध्ये वाढीव माहिती लिहू नका. आपले कौशल्य आणि आवड यांविषयी खरी माहिती लिहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT