NASA Google
एज्युकेशन जॉब्स

'NASA'मध्ये करिअर घडवायचं आहे? पगारही मिळणार बक्कळ, जाणून घ्या जाॅबच्या संधी

नासाची योजना चंद्र आणि मंगळाच्या कितीतरी पुढे जाण्याची आहे. त्यासाठी नासाला साहजिकच मनुष्य बळाची गरज भासणार आहे.

बाळकृष्ण मधाळे

सातारा : नॅशनल एयरोनॉटिक्स अँड स्पेस एडमिनिस्ट्रेशन, नासा (National Aeronautics And Space Administration) ही अमेरिकन सरकारची एक एजन्सी आहे, जी देशाच्या एरोस्पेस, एरोस्पेस आणि स्पेस प्रोग्राम्सच्या अंमलबजावणीत विशेष आहे. नासाचे ध्येय विधान आहे: "नवीन उंची गाठा आणि अज्ञात शोधा म्हणजे जे आपण करतो आणि जे शिकतो त्याचा परिणाम मानवाच्या सर्वांना होईल". नासामध्ये नोकरीच्या अनेक रोमांचक संधी आहेत आणि नासामध्ये सामील होण्याचे बरेच मार्ग आहेत. अंतराळाची योग्य आणि अचूक माहिती नासाला असते. अंतराळामध्ये नासाने खूप यशस्वी प्रयोग केलेत. अंतरिक्ष आणि ब्रम्हांडाला जवळून जाणून घेण्याची इच्छा असणारा प्रत्येक माणूस अमेरिकेची अंतरिक्ष एजन्सी नासामध्ये नोकरी करू इच्छित असतो. नासामध्ये नोकरी मिळवणे, म्हणजे खूप मोठे यश मिळवण्यासारखे आहे. पण, नासामध्ये नोकरी मिळवणे खूप कठीण आहे. (Golden Opportunity Job At National Aeronautics And Space Administration NASA)

नासाची योजना चंद्र आणि मंगळाच्या कितीतरी पुढे जाण्याची आहे. त्यासाठी नासाला साहजिकच मनुष्य बळाची गरज भासणार आहे. ही वेगळी गोष्ट आहे की, येथे आपल्या सारखा राजकीय आरक्षणाचा काहीही उपयोग होत नाही. येथे कोणत्याही माणसाला सहज घेतले जाते नाही. नासाला त्यांच्या येथे काम करण्यासाठी योग्य आणि लायक लोकांची गरज आहे आणि नासामध्ये भरती होण्याची प्रक्रिया देखील खूप कठीण ठेवण्यात आलेली आहे. जर तुम्ही देखील नासामध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुम्हाला या गरजेच्या गोष्टी लक्षात असणे खूप गरजेचे आहे.

तुम्ही नासामध्ये नोकरीसाठी अप्लाय कसे करू शकता?

  • या नोकरीसाठी अप्लाय करणारा उमेदवार हा विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनियरिंग किंवा गणितात पदवीधर असणे गरजेचे आहे.

  • याव्यतिरिक्त पदव्युत्तर पदवी आणि त्याच क्षेत्रामध्ये कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. कमीत कमी 1000 तास जेट उडवण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे.

  • उमेदवारांमध्ये लीडरशीप क्वालिटी, टीमवर्क आणि संवाद करण्याची क्षमता असणे गरजेचे आहे.

  • शैक्षणिक योग्यतेच्या व्यतिरिक्त फिजिकली फिट असणे खूप गरजेचे आहे. याव्यतिरिक्त उमेदवाराची धैर्याची परीक्षा देखील घेतली जाते आणि नक्कीच ही कोणासाठीही सहज शक्य गोष्ट नाही आहे.

  • नासामध्ये नोकरी मिळवणे खूप कठीण आहे.

  • नुकतीच नासामध्ये नोकरीची भर्ती चालू होती. त्यासाठी १८३०० लोकांचे प्रस्ताव आले होते, त्यापैकी १२ लोकांनाच भरती करून घेण्यात आले.

  • यावरून तुम्हाला समजले असेलच की, नासामध्ये नोकरी मिळवणे किती कठीण आहे.

  • तरीही आपली महत्वकांक्षा, आपले कष्ट हे नक्कीच सफल होऊ शकतात. नाही असे नाही.

नासाची परीक्षा पास झाल्यानंतर : नासाची परीक्षा पास केलीत आणि नासाच्या सर्व अटी पूर्ण केल्यात, तर तुम्हाला दोन वर्षाची ट्रेनिंग दिले जाते आणि तुमचे मूल्यमापन केले जाते. या ट्रेनिंगच्या दरम्यान खऱ्या मिशनमध्ये कामी येणारे कौशल्य शिकवले जातात.

अंतराळात जाण्याची संधी मिळते : दुसऱ्या स्तरावरील ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर तुम्हाला स्पेसिफिक स्पेस ट्रेनिंग दिली जाते. ज्यामध्ये तुम्हाला सांगितले जाते की, अंतराळात गेल्यानंतर तुम्ही काय कराल. कॉकपिटमध्ये तुम्हाला स्पेस सूट घालून जावे लागते. अंतराळात ६ महिन्यासाठी पाठवण्याच्या आधी ॲस्ट्रोनॉटसला दोन ते तीन वर्ष अतिरिक्त ट्रेनिंग दिले जाते.

ही कामे करावी लागतात : अंतराळामध्ये गेल्यानंतर ॲस्ट्रोनॉटसला कितीतरी एक्सपेरिमेंट्स, रिसर्च आणि हार्डवेअरची दुरुस्ती यांसारखी कामे दिली जातात.

इतके असते वेतन : ॲस्ट्रोनॉटसला वर्षाला १ कोटींहूनही अधिक वेतन दिले जाते. याचा थोडासा अनुभव मिळाल्यानंतर वेतन एक कोटीपेक्षा जास्त होऊ शकते. एवढे कष्ट केल्यानंतर जर कोणी नासापर्यंत पोहचत असेल, तर त्याला एवढे वेतन मिळवण्याचा पूर्णपणे हक्क आहे.

Golden Opportunity Job At National Aeronautics And Space Administration NASA

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT