ITBP google
एज्युकेशन जॉब्स

Government job : ITBPमध्ये दहावी उत्तीर्णांची भरती; असा करा अर्ज

एकूण 108 पदे भरतीद्वारे भरली जाणार आहेत.

नमिता धुरी

मुंबई : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 सप्टेंबर होती, परंतु आता तुम्ही या भरतीसाठी 1 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकता.

या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार recruitment.itbpolice.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. एकूण 108 पदे भरतीद्वारे भरली जाणार आहेत. रिक्त पदांबद्दल अधिक तपशील खाली दिले आहेत. (ITBP recruitment)

एकूण पदे - 108 पदे

कॉन्स्टेबल (सुतार) – ५६ पदे

कॉन्स्टेबल (मेसन) – 31 पदे

कॉन्स्टेबल (प्लंबर) – २१ पदे

शैक्षणिक पात्रता

कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी, उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेचे 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. यासोबतच उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेचे आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

पगार

निवडलेल्या उमेदवारांना 21,700 रुपये ते 69,100 रुपये पगार मिळेल.

वय मर्यादा

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया

कॉन्स्टेबल पदांसाठी निवड होण्यासाठी उमेदवारांना चार टप्प्यांतून जावे लागेल. फेज 1 मध्ये, उमेदवारांना शारीरिक चाचणी द्यावी लागेल, फेज 2 मध्ये त्यांना लेखी चाचणी द्यावी लागेल, फेज 3 मध्ये त्यांना ट्रेड टेस्ट द्यावी लागेल आणि फेज 4 मध्ये त्यांना कागदपत्रं पडताळणी करावी लागेल.

अर्ज फी

सर्व सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल, तर SC, ST आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

असा करा अर्ज

पायरी 1- सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट itbpolice.nic.in वर जा.

स्टेप 2- त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये होमपेजवरील 'नवीन वापरकर्ता नोंदणी' या पोर्टलवर जा आणि नोंदणी करा.

पायरी 3- नोंदणी केल्यानंतर क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करा आणि तुमच्या आवडीच्या पोस्टसाठी अर्ज करा.

पायरी 4- त्यानंतर तुमचा अर्ज भरा आणि अर्ज फी भरा.

पायरी 5- फी भरल्यानंतर, अर्ज जतन करा आणि भविष्यातील वापरासाठी प्रिंट आउट देखील घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT