Jobs_BHEL 
एज्युकेशन जॉब्स

10वी पास आणि ITI उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; फक्त मेरिटवर होणार भरती!

सकाळ डिजिटल टीम

BHEL recruitment 2021: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) कंपनीने अनेक पदांसाठी भरती सुरू केली आहे. ट्रेड अप्रेंटिसच्या १२० रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. दहावी पास आणि आयटीआय झालेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. 

या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १ जानेवारीपासून सुरू झाली असून यासाठी पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशील पुढे दिला आहे. 

महत्त्वाच्या तारखा -
- ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात- १ जानेवारी २०२१
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १६ जानेवारी २०२१
- ऑनलाइन अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची अंतिम तारीख- २३ जानेवारी २०२१

पदांचा तपशील -
पद - ट्रेड अप्रेंटिस
संख्या- १२०

वयोमर्यादा - 
या पदांसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे आणि कमाल वय २७ निश्चित करण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया - 
गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.

पात्रता -
या भरतीशी संबंधित उमेदवाराकडे दहावी उत्तीर्ण तसेच आयटीआयचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. 

शुल्क -
या पदासाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही प्रवर्गातील उमेदवाराला कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. फक्त अर्ज भरावा लागणार आहे. 

अर्ज करण्याची प्रक्रिया - 
इच्छुक उमेदवारांनी प्रथम अधिकृत संकेतस्थळावर जावे आणि अर्ज ऑनलाईन भरून निर्धारित वेळेत हार्ड कॉपी पुढील पत्त्यावर पाठवावी.
पत्ता - भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, खैलार, भेल झांशी, उत्तर प्रदेश - २८४१२०

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा
अधिसूचना (नोटिफिकेसन) पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा
अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

SCROLL FOR NEXT