Indian Army Recruitment 2022 esakal
एज्युकेशन जॉब्स

भारतीय सैन्यात नोकरीची संधी, 10वी, 12वी पास करू शकतात अर्ज

सकाळ डिजिटल टीम

Indian Army Recruitment 2022 : भारतीय सैन्यात नोकरी (Indian Army) शोधत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय सैन्याने मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (MIRC), अहमदनगर, महाराष्ट्र, संरक्षण मंत्रालय ) अंतर्गत कुक, वॉशरमन (MTS), सफाई कर्मचारी, बार्बर आणि LDC या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट indianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात

याशिवाय, उमेदवार https://indianarmy.nic.in/ या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. तसेच, या लिंकद्वारे इंडियन आर्मी मुख्यालय एमआयआरसी भर्ती 2022 अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत 45 पदे भरली जातील. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी आहे.

भारतीय सैन्य भरती 2022 साठी महत्वाची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 फेब्रुवारी 2022

रिक्त पदांचा तपशील

कुक – 11 (UR-7, SC-1, OBC-2, EWS-1)

वॉशर – 3 (UR-3)

सफाई कर्मचारी (MTS) – 13 (UR-8, SC-1, OBC-3, EWS-1) )

बार्बर – 7 (UR-5, SC-1, OBC-1)

LDC (HQ) – 7 (UR-5, SC-1, OBC-1)

LDC (MIR) – 4 (UR-3, OBC- 1)

पगार किती मिळेल?

कुक आणि एलडीसी - 19900- 63200/- रुपये (स्तर 7व्या CPC पे मॅट्रिक्सनुसार)

इतर - 18000- 56900/- रुपये (स्तर 1 7 व्या CPC वेतन मॅट्रिक्सनुसार)

पात्रता निकष

  • कुक – उमेदवारांनी भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान असणे आणि 10वी उत्तीर्ण केलेली असावी.

  • वॉशरमन – इयत्ता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

  • सफाई कर्मचारी (MTS) – उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असावा.

  • बार्बर – 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

  • LDC – 12वी पास संगणकावर इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट आणि हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट टाईपिंग स्पीडसह.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तीस्ता नदी प्रकल्पावरून भारत-चीनमध्ये नवा संघर्ष! चिकन नेकजवळ हालचाली वाढल्या; भारताच्या चिंतेवर ड्रॅगनचं मोठं प्रत्युत्तर

Heavy Rain in Pune Ghats: पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाची जोरदार हजेरी ; भिरा येथे विक्रमी ४०७ मिमी पावसाची नोंद

GBS Virus: कोरोना महामारीनंतर 'जीबीएस'चं संकट, पनवेलमध्ये दोन रुग्ण पॉसिटीव्ह; नेमका आजार काय?

Social Harmony: धर्मापलीकडची माणुसकी! मुस्लिम युवकाच्या वडाची वटसावित्रीला पूजा, गंगापूरमधील वटसावित्री उत्सव ठरला प्रेरणादायी..

महाराष्ट्रातील आरोग्य विभागात ५,२२३ नव्या पदांची मेगाभरती! अनेक जिल्ह्यांतील रुग्णालयांमध्ये जागा भरणार; कुठे आणि कधी?

SCROLL FOR NEXT