NHM Esakal
एज्युकेशन जॉब्स

आरोग्य सेविकांसाठी NHM नागपूरमध्ये नोकरीची संधी! ८९ पदे भरणार

उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

सकाळ डिजिटल टीम

आरोग्य सेविकांसाठी नागपूरमध्ये नोकरीची संधी निर्माण झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर (National Health Mission Nagpur) येथे नोकरीसाठी ८९ पदे भरायची असून ८ मार्चपर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था, आरोग्य विभाग, सिव्हिल लाइन्स, नागपूर महानगरपालिका या पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचा आहे.

शैक्षणिक पात्रता-अनुभव- या पदासाठी पात्र उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण होणं गरजेचं आहे. तसेच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून ANM चा कोर्स करणे आवश्यक आहे. या पदाचा आधी अनुभव घेतलेल्या सेविकांना प्राधान्य दिले जाणार आहे. पात्र उमेदवारांना १८ हजार रूपये पगार दिला जाणार आहे.

ही कागदपत्रे आवश्यक- उमेदवारांना त्यांचा Resume (बायोडेटा), दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) आधारकार्ड, लायसन्स ओळखपत्र, पासपोर्ट साईज फोटो सोबत जोडायचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir: रामभक्तांसाठी सर्वात मोठी खुशखबर! १३ एप्रिलपासून राम मंदिर परिसरातील सर्व १८ मंदिरांचे दर्शन सुरू; असा मिळवा 'स्पेशल पास'

Panchang 12 April 2026 : आजचे पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाल अन् दिनविशेष जाणून घ्या

आजचे राशिभविष्य - 12 एप्रिल 2026

Quick & Healthy Weekend Breakfast: रविवारच्या स्लो मॉर्निंगसाठी परफेक्ट; १० मिनिटांत बनवा हेल्दी बनाना-ओट्स पॅनकेक्स

Tamilnadu election row: रणधुमाळीत ‘जननायकन’चा ‘पब्लिक शो’

SCROLL FOR NEXT