Job News esakal
एज्युकेशन जॉब्स

BTech पास तरुणांसाठी नोकरी! 12 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत करा अर्ज

BTech पास तरुणांसाठी उत्तम नोकरी! 12 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत करा अर्ज

श्रीनिवास दुध्याल

अद्याप अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. पुढील महिन्यात 12 नोव्हेंबरपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होईल आणि 4 डिसेंबर 2021 पर्यंत चालेल.

सोलापूर : उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (Uttar Pradesh Power Corporation Limited - UPPCL) ने सहाय्यक अभियंता (प्रशिक्षणार्थी) आणि कनिष्ठ अभियंता पदांच्या भरतीसाठी (Recruitment) अधिसूचना जारी केली आहे. या UPPCL अंतर्गत एकूण 113 पदांची भरती केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते अधिकृत पोर्टल upenergy.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. मात्र, अद्याप अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. पुढील महिन्यात 12 नोव्हेंबरपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होईल आणि 4 डिसेंबर 2021 पर्यंत चालेल. अशा परिस्थितीत, ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते या कालावधीत करू शकतात. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे, की त्यांनी फॉर्म पूर्णपणे वाचल्यानंतरच अर्ज करावा; कारण अर्जामध्ये काही विसंगती आढळल्यास अर्ज नाकारला जाईल.

या तारखा लक्षात ठेवा

  • ऑनलाइन अर्ज सादर करण्यास प्रारंभ : 12 नोव्हेंबर 2021

  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 2 डिसेंबर 2021

  • फी भरण्याची तारीख (ऑफलाइन) : 12 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2021

  • फी भरण्याचे प्रकार (ऑनलाइन) : SBI बॅंक चलन वापरून, डेबिट / क्रेडिट कार्ड / नेट बॅंकिंगद्वारे

रिक्त जागांचा तपशील

  • सहाय्यक अभियंता प्रशिक्षणार्थी इलेक्‍ट्रिकल - 75 पदे

  • सहाय्यक अभियंता प्रशिक्षणार्थी इलेक्‍ट्रॉनिक्‍स - 14 पदे

  • सहाय्यक अभियंता प्रशिक्षणार्थी कॉम्प्युटर सायन्स - 24 पदे

शैक्षणिक पात्रता

सहाय्यक अभियंता प्रशिक्षणार्थी इलेक्‍ट्रिकल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्‍ट्रिकलमधील अभियांत्रिकी पदवी असणे आवश्‍यक आहे. तर सहाय्यक अभियंता प्रशिक्षणार्थी कॉम्प्युटर सायन्स आयटी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून संगणक शास्त्रातील अभियांत्रिकी पदवी असणे आवश्‍यक आहे.

ही असेल फी

सामान्य श्रेणीतील उमेदवार आणि इतर राज्यांतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 1180 रुपये भरावे लागतील. तर SC श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 826 आणि PH श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 12 रुपये भरावे लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaghcha Raja Look: लालबागचा राजा २०२५ चा पहिला लूक समोर, प्रथम दर्शनातून दिसली पहिली झलक, पाहा व्हिडिओ

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Nagpur Fraud;'बेटिंग ॲप’द्वारे किराणा व्यापाऱ्याची २६ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT