संरक्षण मंत्रालय Sakal
एज्युकेशन जॉब्स

संरक्षण मंत्रालयासाठी निघाली गट सी पदांची भरती!

संरक्षण मंत्रालयासाठी निघाली गट सी पदांची भरती! दहावी-बारावी उत्तीर्णांना संधी

श्रीनिवास दुध्याल

संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defence - MOD) गट सी पदांच्या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले आहेत.

सोलापूर : संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defence - MOD) गट सी पदांच्या भरतीसाठी (Recruitment) पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या या भरतीमध्ये स्टेनोग्राफर, एलडीसी, मेसेंजर आणि सफाईवाला यांसारख्या नागरी पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

या भरतीतील एकूण रिक्त पदांची संख्या 6 आहे, ज्यामध्ये स्टेनोग्राफर, निम्न विभाग लिपिक, मेसेंजर आणि सफाईवाला अशी पदे आहेत. इच्छुक उमेदवार रोजगार वृत्तपत्रात भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसांच्या आत (20 नोव्हेंबरपर्यंत) अर्ज करू शकतात. या भरतीची सविस्तर माहिती 30 ऑक्‍टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या रोजगार वृत्तपत्रात पाहता येईल.

रिक्त जागांचा तपशील

  • एकूण पदे : 6

  • स्टेनोग्राफर ग्रेड II : 1 पद

  • निम्न विभाग लिपिक : 1 पद

  • मेसेंजर : 3 पदे

  • सफाईवाला : 1 पद

पात्रता व निकष

स्टेनोग्राफर आणि एलडीसीसाठी उमेदवार 12 वी पास आवश्‍यक आहे. तर दहावी उत्तीर्ण उमेदवार मेसेंजर आणि सफाईवालासाठी अर्ज करू शकतात.

विहित नमुन्यात संरक्षण मंत्रालयाच्या गट सी रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावेत : संरक्षण मंत्रालय, मुख्यालय, 111 सब झोन, बेंगदुबी मिलिटरी स्टेशन (पश्‍चिम बंगाल), स्टेशन हेडक्वार्टर, हाशिमारा (पश्‍चिम बंगाल) आणि स्टेशन मुख्यालय गंगटोक. अर्ज 21 दिवसांच्या आत पाठवू शकता. अधिक माहितीसाठी रोजगार वर्तमानपत्र पाहू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT