State Level Board Exams esakal
एज्युकेशन जॉब्स

पाचवी ते अकरावी राज्यस्तरीय बोर्डाची परीक्षा रद्द; सरकारचं परिपत्रक रद्द करत High Court चा महत्त्वाचा आदेश

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ५ वी, ८ वी, ९ वी आणि ११ वीच्या बोर्डाची परीक्षा घेण्याचे राज्य सरकारने परिपत्रक जारी केले होते.

सकाळ डिजिटल टीम

राज्य सरकारने यापूर्वी राज्य अभ्यासक्रमाच्या शाळांमधील इयत्ता पाचवी, आठवी, नववी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावरील मूल्यांकनाऐवजी राज्यस्तरीय बोर्ड परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता.

बंगळूर : राज्याचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये पाचवी, आठवी, नववी आणि ११ वीच्या वर्गासाठी राज्यस्तरीय बोर्ड परीक्षा (Board Exam) घेण्याचे राज्य सरकारने (Karnataka Government) जारी केलेले परिपत्रक उच्च न्यायालयाने (High Court) रद्द केले आहे. त्यामुळे या वर्गांच्या बोर्ड परीक्षा आता होणार नाहीत.

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ५ वी, ८ वी, ९ वी आणि ११ वीच्या बोर्डाची परीक्षा घेण्याचे राज्य सरकारने परिपत्रक जारी केले होते. पण हे परिपत्रक उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले. या निकालाने बोर्डाची परीक्षा घेण्याचा सरकारचा निर्णय आता रद्द ठरला आहे.

राज्य सरकारने यापूर्वी राज्य अभ्यासक्रमाच्या शाळांमधील इयत्ता पाचवी, आठवी, नववी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावरील मूल्यांकनाऐवजी राज्यस्तरीय बोर्ड परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवी होसमनी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या विनाअनुदानित खासगी शाळांच्या संघटनेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दिली. त्यानुसार पाचवी, आठवी, नववी आणि ११ वीच्या बोर्ड परीक्षा घेण्याचा सरकारचा निर्णय रद्द केला.

परिणामी ९ ते ११ मार्च दरम्यान होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे रद्द ठरल्या आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाने ६ आणि ९ ऑक्टोबर २०२३ रोजी शिक्षण कायद्यांतर्गत दोन परिपत्रके जारी करून बोर्ड स्तरावरील परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता.

सरकारच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्या संघटनेने म्हटले आहे की, शिक्षण विभागाचे परिपत्रक केवळ सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना लागू होते. हा अभ्यासक्रमाचा भाग नाही. तथापि, सरकारने बोर्ड परीक्षेसाठी लर्निंग रिकव्हरी अभ्यासक्रमातून प्रश्न तयार करण्यास सरकार सांगत आहे. खासगी शाळांचा अभ्यासक्रम आणि सरकारी शाळांचा अभ्यासक्रम वेगळा आहे. त्यामुळे रिकव्हरी अभ्यासक्रमातील प्रश्नांना उत्तर देणे खासगी शाळेतील मुलांना कठीण होणार होते.

त्यामुळे बोर्ड स्तरावरील परीक्षा सर्व मुलांना लागू होऊ नये, शिकण्याची पुनर्प्राप्ती हा देखील अभ्यासक्रमाचा एक भाग आहे, अशी विनंती सरकारच्या वकिलांनी केली होती. शिकण्याचा पुनर्प्राप्ती अभ्यासक्रम सामान्य अभ्यासक्रमातून तयार केला जातो. हे मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये सकारात्मक वाढ होण्यासाठी तयार केले आहे.

सरकारची विनंती धुडकावली

प्रश्नपत्रिकेत अतिरिक्त अभ्यासक्रमाचे प्रश्न नाहीत. त्यामुळे बोर्ड परीक्षेसाठी रिकव्हरी अभ्यासक्रम शिकणे शक्य आहे. त्यानुसार परीक्षा घेण्यात यावी, अशी विनंती सरकारने केली असली तरी उच्च न्यायालयाने ते मान्य केले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT