Scholarship  sakal
एज्युकेशन जॉब्स

Scholarship: उच्च शिक्षणातील शिष्यवृत्त्यांसाठी तब्बल सव्वा लाख अर्ज

विविध प्रकारच्या १४ शिष्यवृत्त्यांसाठी आतापर्यंत राज्यातील एक लाख २७ हजार ४८३ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे.

मीनाक्षी गुरव

पुणे : उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या १४ शिष्यवृत्त्यांसाठी आतापर्यंत राज्यातील एक लाख २७ हजार ४८३ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्यांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत महाडीबीटी पोर्टलमार्फत अर्ज करता येणार आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करणे आवश्यक आहे, अशी माहिती उच्च शिक्षण संचालनालयातर्फे देण्यात आली आहे. (Education Scholarship Application Updates)

शिष्यवृत्त्यांसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी तसेच तांत्रिक अडचणींमुळे अर्ज भरून शकलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता यावेत, यासाठी उच्च शिक्षण संचालनालयाचे शिक्षण सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव यांनी यापूर्वीच मुदतवाढ दिली आहे.

उच्च शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्त्यांमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना, एकलव्य शिष्यवृत्ती, गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य शिष्यवृत्ती (कनिष्ठ स्तर) आणि (वरिष्ठ स्तर), राज्य सरकारची दक्षिणा अधिछात्रवृत्ती, शासकीय संशोधन अधिछात्रवृत्ती, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची शिष्यवृत्ती, राज्य सरकारची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती, राज्य सरकारची अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (भाग-२), माजी सैनिकांच्या पाल्यांना दिले जाणारे आर्थिक साहाय्य, स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना दिले जाणारे आर्थिक साहाय्य आदींचा समावेश आहे.

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : https://mahadbtmahait.gov.in

महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीसाठी आलेल्या अर्जाचा तपशील :

तपशील : २०२०-२१ : २०२१-२२ (आतापर्यंत)

  • एकूण प्राप्त अर्ज : २,१२,१५३ : १,२७,४८३

  • विद्यार्थ्यांनी रद्द केलेले अर्ज : २३,४१८ : १०,२३३

  • त्रुटी र्पूतेसाठी विद्यार्थ्यांना परत केलेले अर्ज : ७,६९४ : ४,७४४

  • महाविद्यालय स्तरावर प्रलंबित अर्ज : २,२२२ : ५३,१९०

  • विभाग स्तरावर प्रलंबित अर्ज : ७६५ : २७,६५४

शिष्यवृत्तीनिहाय आलेल्या अर्जांची संख्या : (वर्ष २०२१-२२)

शिष्यवृत्ती : आलेल्या अर्जांची संख्या

  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती : १,१७,८६१

  • डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना : २,७९१

  • एकलव्य शिष्यवृत्ती : १,३६९

  • राज्य सरकारची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती : २,३९७

  • राज्य सरकारची अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (भाग-२) : १,५०६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT