student  Sakal
एज्युकेशन जॉब्स

Education : उच्च व तंत्र शिक्षण विभागाला येईना जाग! विद्यार्थ्यांचे ‘अभियंता’, ‘वकील’ होण्याचे स्वप्नं धुळीस

खासगी विद्यापीठांच्या तिजोऱ्या भरण्याच्या नादात राज्य सरकार बारावीच्या पुरवणी परीक्षा निकालाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे ‘अभियंता’, ‘वकील’ होण्याचे स्वप्नं धुळीस मिळवत आहे.

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे - एकीकडे राज्यातील खासगी विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू झालेल्या नाहीत, तर दुसरीकडे उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सरकारी, अनुदानित, खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांमधील बहुतांश व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया पद्धतशीरपणे आटोपण्यात आल्या आहेत.

खासगी विद्यापीठांच्या तिजोऱ्या भरण्याच्या नादात राज्य सरकार बारावीच्या पुरवणी परीक्षा निकालाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे ‘अभियंता’, ‘वकील’ होण्याचे स्वप्नं धुळीस मिळवत आहे.

राज्यातील १४ लाख १६ हजार ३७१ नियमित विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेतलेली बारावीची बोर्डाची परीक्षा दिली आहे. या परीक्षेत एक लाख २३ हजार ९०३ नियमित विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. तर १९ हजार ८०८ पुनर्परीक्षार्थी आणि सहा हजार ३०८ खासगी विद्यार्थी मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत.

त्यातील जवळपास सव्वा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावीची पुरवणी परीक्षा दिली आहे. या परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात लावण्यासाठी राज्य मंडळातर्फे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, निकालाची वाट न पाहताच सीईटी सेलने व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा आटोपली आहे. खरंतर अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) ही प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे अधिकार त्या-त्या राज्यांना असल्याची माहिती एआयसीटीईच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.

त्यामुळे पुरवणी परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या आणि विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेत प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे बी.ई, बी.टेक, एलएलबी अशा अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याचे स्वप्नं अर्धवट राहणार की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘राज्यात सध्या तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी पावले उचलली जातील.’

- डॉ. विनोद मोहितकर, संचालक, तंत्र शिक्षण विभाग

फेब्रुवारी-मार्च २०२३मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालातील आकडेवारी :

नियमित विद्यार्थ्यांचा निकाल

तपशील : एकूण

परीक्षा दिलेले विद्यार्थी : १४,१६,३७१

उत्तीर्ण विद्यार्थी : १२,९२,४६८

अनुत्तीर्ण झालेले : १,२३,९०३

उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांचे मौन!

बारावीची पुरवणी परीक्षा दिलेले विद्यार्थी एकीकडे निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. तर दुसरीकडे पुढील अभ्यासक्रमात आपल्याला प्रवेश मिळणार की नाही, या चिंतेत आहेत. जवळपास सव्वा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.

या विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण घेण्याची संधी मिळावी, त्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु मंत्र्यांकडून अद्याप कोणतेही ठोस उत्तर न आल्याने उच्च शिक्षण घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत मंत्री महोदयांचे मौन का!, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुम्ही मला अस्पृश्यासारखी वागणूक देता, 'शुद्धीकरण' करता आणि माझा अपमान करता."- खर्गे राज्यसभेत संतापले

Solapur Crime: ‘मुलाला जन्म देऊ शकत नाहीस, माहेरहून ४० लाख घेऊन ये’; विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह सात जणांवर गुन्हा

World Organ Donation Day 2026: कॅन्सर झाला असेल तर अवयवदान करता येतं का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

World Organ Donation Day: किडनी प्रत्यारोपणातील तफावत; एका अवयवदानाने कसे बदलू शकते आयुष्य...

Abhijit Dipke: "हे जंतर मंतर नाही; इथे गोंधळ चालणार नाही,"; लोकांनी अभिजीत दीपकेला पार्कमधून हाकलल्याचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT