Karnataka Hijab Controversy esakal
एज्युकेशन जॉब्स

कर्नाटकातील हिजाब वाद चिघळला! 58 विद्यार्थ्यांचं निलंबन

सकाळ डिजिटल टीम

आंदोलक विद्यार्थ्यांवर आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Karnataka Hijab Controversy : कर्नाटकातील हिजाब वादानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटले आहेत. काही जण हिजाबचे समर्थन करत आहेत, तर काही जण हिजाबला विरोध करत आहेत. या वादानंतर एका शाळेतील 58 विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आलंय. तर, तुमकुर महाविद्यालयातील (Tumkur College) 20 विद्यार्थ्यांविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यात आल्याचं समजतंय. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कर्नाटकातील शिवमोगा (Shivamogga) जिल्ह्यात घडलीय. येथील कर्नाटक पब्लिक स्कूलच्या (Karnataka Public School) 58 विद्यार्थिनींनी हिजाब घालण्याची मागणी करत वर्गात प्रवेश केला आणि निदर्शनं केली.

कर्नाटक पब्लिक स्कूलचे विद्यार्थी वर्गात हिजाब घालण्याची मागणी करत होते. याबाबत त्यांनी वर्गात प्रात्यक्षिकही दाखवली. 'आम्ही मरुन जावू; पण हिजाब सोडणार नाही', असं थेट आव्हान विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाला दिलं. त्यामुळं या आंदोलक विद्यार्थ्यांवर आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयातही (Karnataka High Court) नियमित सुनावणी सुरूय. त्यामुळं न्यायालयानं अंतिम निर्णय होईपर्यंत हिजाब, बुरखा, भगवा गमचा इत्यादी धार्मिक कपडे घालण्यास बंदी घातलीय. यावर अल्पसंख्याक कल्याण विभागाचे सचिव मेजर पी मनिवन्नन म्हणाले, उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश अल्पसंख्याक कल्याण विभागाच्या अंतर्गत चालणाऱ्या निवासी शाळांनाही लागू आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना वर्गात भगवी शाल, स्कार्फ, हिजाब किंवा धार्मिक कपडे घालण्यास मनाई आहे. पुढील आदेशापर्यंत या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचनाही अल्पसंख्याक विभागानं दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Crisis : मुंबईवर अभूतपूर्व पाणी संकट ! जलाशयांत केवळ १० टक्के पाणीसाठा; बांधकाम, जलतरणचा पाणीपुरवठा आजपासून बंद

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

PM Kisan 23rd Installment: 23व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली! 2,000 रुपये कधी खात्यात येणार? थेट कृषिमंत्र्यांनीच सांगितली तारीख

SC Reservation Subclassification : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत एक लाखांहून अधिक हरकती, सरकार घाईगडबडीत निर्णय घेणार नाही; मंत्री शिरसाट यांची ग्वाही

Satara Accident: दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याचे स्वप्न अधुरे! बनपुरीजवळ दुचाकी-पिकअपची समोरासमोर धडक; १६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT