How Agniveer will serve the country How Agniveer will serve the country
एज्युकेशन जॉब्स

Agnipath : कशी करेल देशाची सेवा; करिअर कसे असेल, जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशाच्या लष्कर, हवाई दल आणि नौदलात अग्निशमन दलाच्या भरतीसाठी अग्निपथ (Agniveer) योजना संरक्षण मंत्रालयाने जाहीर केली आहे. मंगळवारी (ता. १४) दिल्लीतील विज्ञान भवनात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत तिन्ही दलांच्या प्रमुखांनी या योजनेची घोषणा केली आणि आवश्यक माहिती दिली. (How Agniveer will serve the country)

या योजनेमुळे लष्कराचे सरासरी वय कमी होईल. आतापर्यंत हे वय ३२ वर्षे होते ते आता २४ ते २६ वर्षांपर्यंत खाली येईल, असे योजनेचे वर्णन करताना लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी सांगितले. अग्निपथ योजनेतून (Agniveer) करिअर (career) कसे घडेल याचीही सविस्तर माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. जाणून घेऊया अग्निपथ योजनेच्या काही गोष्टी...

  • या योजनेअंतर्गत मुलगा आणि मुलगी दोघांनाही तिन्ही सेवांमध्ये भरती होण्याची संधी मिळेल.

  • अग्निवीरसाठी अर्ज करण्यासाठी वय १७ वर्षे ६ महिने ते २१ वर्षे दरम्यान असावे.

  • अग्निवीरांसाठी वैद्यकीय आणि शारीरिक तंदुरुस्तीचे नियम तेच राहतील जे आतापर्यंत इतर सैनिकांसाठी होते.

  • दहावी आणि बारावी उत्तीर्ण तरुणांना अग्निवीर म्हणून विविध पदांवर भरतीसाठी संधी दिली जाईल.

  • अग्निवीरांना पहिल्या वर्षी वार्षिक ४.७६ लाखांचे पॅकेज मिळेल. चौथ्या वर्षाच्या अखेरीस ही रक्कम ६.९२ लाख होईल.

  • सेवा संपल्यावर ११.७ लाखांचे पॅकेज दिले जाईल. सेवेदरम्यान शहीद झाल्यास कुटुंबीयांना एक कोटी मिळणार आहेत.

  • सेवेदरम्यान अपंगत्व आल्यास किंवा गंभीर दुखापत झाल्यास ४४ लाखांचे कव्हरेज दिले जाईल.

  • सेवा निधी पॅकेजवर कोणताही कर आकारला जाणार नाही.

  • अग्निवीर म्हणून ४ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या सैनिकांना इतर संस्थांमध्ये रोजगाराच्या संधी मिळतील आणि त्यांनाही प्राधान्य दिले जाईल.

  • २५ टक्के अग्निवीरांची लष्करात दीर्घकालीन सेवेसाठीही निवड केली जाईल.

  • अग्निवीरांची पहिली भरती ९० दिवसांच्या आत केली जाईल.

  • यावर्षी पहिल्या बॅचमध्ये एकूण ४६,००० अग्निवीरांची भरती केली जाईल.

  • अग्निवीरांच्या भरतीसाठी सैन्य मेळावा होणार.

  • तिन्ही सेना काही संस्थांना भेट देऊन कॅम्पस इंटरव्ह्यूही घेतील.

  • आयटीआय करणाऱ्या तरुणांना विशेष संधी मिळणार आहे.

  • निवृत्तीनंतरही त्यांना दुसरी नोकरी मिळणे सोपे व्हावे यासाठी ‘अग्नीवीर कौशल्य प्रमाणपत्र’ जारी केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT