job interview sakal
एज्युकेशन जॉब्स

Job Interview: नोकरीसाठी मुलाखत उत्तम व्हावी असं वाटतंय? या तीन टिप्स लक्षात ठेवा

मुलाखतीत विविध प्रश्न विचारून तुम्ही कसे आहात याचा आढावा घेतला जातो

सकाळ डिजिटल टीम

नोकरी करण्यासाठी आधी मुलाखत द्यावी लागते. या मुलाखतीत विविध प्रश्न विचारून तुम्ही कसे आहात याचा आढावा घेतला जातो. त्यामुळे नोकरीच्या मुलाखतीला जाताना, अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. त्यात काही नोकरीशी, काही स्वत:शी संबंधित, काही स्वत:च्या शिक्षण आणि अनुभवाशी संबंधित असे प्रश्न असतात. मुलाखतकार कोणता प्रश्न विचारणार असा आपल्याला प्रश्न पडतो. या मुलाखतीमधून मुलाखतकार कर्मचाऱ्यामध्ये त्याची कामाची आवड. समर्पण, कामाचे कौशल्य हे गुण बघतात. त्यामुळेच तुम्हाला कोणत्याही नोकरीच्या मुलाखतीत यशस्वी व्हायचे असेल, तर इंटरव्ह्यू दरम्यान तुमच्या कामाबद्दल तुम्हाला किती आवड आहे हे सिद्ध करावे लागेल. यासाठी साधारणपणे तीन प्रश्न विचारले जाऊ शकतात.

हा जॉब निवडण्याचे कारण? कोणत्याही मुलाखतीच्या सुरुवातीला तुम्ही यापूर्वी कुठे आणि किती काम केले आहे हे सांगण्यापेक्षा तुमच्या महत्त्वाकांक्षा सांगा. तसेच हे काम करण्याचा विचार का करत आहात तेही सांगा. भूतकाळात तुम्ही केलेल्या कामाचा काय परिणाम झाला हेही सांगता येईल. त्याचा फायदा नक्की होईल.

कामात वेळ कसा घालवायचा?- अनेक लोकं कामाबाबात खूप विचार करतात. ते वर्कहोलिक असतात. क्षमतेपेक्षा जास्त काम करायला अनेकांना आवडते. त्यामुळे ही वैशिष्ट्ये ते मुलाखतकाराला सांगू शकतील. त्यांनी किती वेळा कम्फर्ट झोन तोडून काम केले ते शेअर करावे. म्हणजेत त्यांनी वेळेला महत्व न देता त्यांचे लक्ष्य पूर्ण करत चांगले परिणाम दिले.

वेगळे काम करत असाल तर उल्लेख करा- अनेकदा तुमची आवड फक्त नोकरीपुरती मर्यादित नसते. हे तुम्हाला तुमच्या कामाच्या व्याप्तीच्या पलीकडेही प्रेरणा देते. मुलाखतीत एका व्यक्तीने बेघर लोकांना कशी मदत केली हे देखील सांगितले. त्याने एक प्रोग्राम कोड केला ज्यामुळे सर्व्हिंगची कार्यक्षमता वाढली. त्यांच्या प्रयत्नांतून मोठा फरक दिसून आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT