CBSE logo google
एज्युकेशन जॉब्स

खरंच अशाप्रकारे होणार का सीबीएसई दहावी-बारावीचं मूल्यमापन ?

सीबीएसईची दहावी-बारावीची दुसऱ्या सत्राची परीक्षा लवकरच सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अंतिम मूल्यमापनाबाबतचे एक पत्रक समाजमाध्यमावर प्रसारित झाले असून सीबीएसईकडून मात्र काही वेगळेच सांगितले जात आहे.

सकाळ ऑनलाईन

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) यंदाच्या शैक्षणिक वर्षातील दहावी-बारावीची परीक्षा दोन सत्रांत आयोजित केली आहे. त्यामुळे अंतिम निकाल देताना पहिल्या सत्राला ३० टक्के आणि दुसऱ्या सत्राला ७० टक्के महत्त्व दिले जाणार असल्याची चर्चा सध्या समाजमाध्यमांवर रंगली आहे.

सीबीएसईच्या नावाने एक पत्रक सध्या समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. यात म्हटले आहे की, सीबीएसई दहावी आणि बारावीचा अंतिम निकाल जाहीर करताना ३० टक्के महत्त्व पहिल्या सत्राला व ७० टक्के महत्त्व दुसऱ्या सत्राला दिले जाणार आहे; मात्र अंतर्गत मूल्यमापन पद्धतीत कोणताही बदल होणार नाही. तसेच ज्या विद्यार्थ्यांना करोना संसर्गामुळे अथवा ऑलिम्पियाड परीक्षा किंवा क्रीडा सामन्यांमुळे पहिल्या सत्राची परीक्षा देता आली नाही त्यांचे मूल्यमापन दुसऱ्या सत्राच्या आधारे केले जाणार आहे, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

यावर्षी प्रथमच सीबीएसईने दहावी-बारावीची परीक्षा दोन सत्रांमध्ये आयोजित केली आहे. नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ मध्ये पहिल्या सत्राची परीक्षा पार पडली आणि त्याचा निकालही जाहीर झाला आहे. दुसऱ्या सत्राची परीक्षा २६ एप्रिलला सुरू होणार आहे. दहावीची परीक्षा २४ मे या दिवशी आणि बारावीची परीक्षा १५ जूनला संपणार आहे. त्यानंतर सविस्तर निकाल जाहीर केला जाणार आहे; मात्र समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेल्या पत्रकातील दावे सीबीएसईने फेटाळले आहेत. या खोट्या पत्रकाबाबत विद्यार्थ्यांनी सावध राहण्याबाबतचे ट्विट सीबीएसईने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT