एज्युकेशन जॉब्स

Indian Navy jobs for 10th pass : 10 वी पास उमेदवारांनाही मिळु शकते भारतीय नौदलात नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर माहिती

नेव्हीमध्ये म्हणजेच भारतीय नौदलात काम करण्याची अनेकांना इच्छा असते.

Aishwarya Musale

दहावीनंतर तुमच्यासाठी करिअरचे कोणते पर्याय खुले आहेत असे विचारले तर तुमचे उत्तर काय असेल? तुम्हाला वाटत असेल की दहावीनंतर बारावी करून कुठल्यातरी मोठ्या कोर्सला प्रवेश घ्यावा लागेल, पण तसे नाही. 10वी नंतर करिअरचे अनेक पर्याय आहेत.

असाच एक पर्याय म्हणजे इंडियन नेव्ही. ज्या लोकांना 10वी नंतरच करिअर सुरू करायचे आहे, त्यांच्यासाठी अर्ज करण्याची संधी आहे.10वी नंतर नौदलातील नोकऱ्या चांगल्या जॉब प्रोफाइल आणि चांगले पगाराचे पॅकेज देतात.

10वी पास उमेदवारांची भरती 'इंडियन नेव्ही एमआर' या पदावर केली जाते. या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण असावा. या पदावर नोकरी मिळविण्यासाठी, निवड प्रक्रियेमध्ये CBT, शारीरिक फिटनेस चाचणी, वैद्यकीय परीक्षा यांचा समावेश होतो. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर  शेफ, steward, hygienist या पदांवर काम करण्याची संधी मिळते.

वर्षातून दोनदा, भारतीय नौदल MR (मॅट्रिक भर्ती) जून/जुलै आणि नोव्हेंबर/डिसेंबरमध्ये ऑनलाइन अर्ज घेते. भारतीय नौदल 10 वी नंतर 3 रोजगार श्रेणी ऑफर करते.

शेफ एमआर: या पदावर काम करणारी व्यक्ती मेनूमध्ये दिलेले अन्न (शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसह) तयार करेल तसेच रेशनची काळजी घेईल. याशिवाय firearms training मिळेल.

स्टीवर्ड एमआर: या पदावर काम करणाऱ्या लोकांना वेटरिंग, हाउसकीपिंग, पैशांचा हिशेब, वाईन आणि इतर गोष्टींची काळजी घेणे, अधिकाऱ्यांच्या मेस सुविधांमध्ये मेनू तयार करणे इत्यादी कामे करावी लागतील. firearms training ही दिले जाणार आहे.

हायजिनिस्ट एमआर: शौचालय आणि इतर ठिकाणे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी दिली जाईल. याव्यतिरिक्त, तुम्हाला firearms training देखील दिले जाईल.

भारतीय नौदलाच्या भरती नियमांनुसार, स्टीवर्ड, शेफ आणि सॅनिटरी हायजिनिस्ट या पदांसाठी उमेदवारांचे वय नावनोंदणीच्या दिवशी 17 ते 20 वर्षांच्या दरम्यान असावे. या पदांच्या भरतीसाठी Computer-Based Test (CBT), फिजिकल फिटनेस टेस्ट (PFT), मेडिकल एग्जाम असेल.

CBT हा 100 गुणांचा पेपर असेल. या परीक्षेच्या पेपरमध्ये चार विभाग असतील. प्रत्येकी 25 प्रश्न असतील. करंट अफेअर्स, जनरल नॉलेज, जनरल सायन्स, मॅथ्स या विषयांचे प्रश्न असतील. तुम्ही www.joinindiannavy.gov.in वरून अभ्यासक्रम आणि इतर माहिती मिळवू शकता.

फिजिकल फिटनेस टेस्टमध्ये 1.6 किमी धावणे 7 मिनिटांत पूर्ण करावे लागेल. 20 स्क्वॅट अप आणि 10 पुश-अप करावे लागतील. मेडिकल एग्जाममध्ये उमेदवाराचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य तपासले जाईल.

तीनही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना प्रशिक्षणादरम्यान 14,600 रुपये स्टायपेंड मिळेल. प्रारंभिक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांना लेव्हल 3 डिफेंसवर मॅट्रिक्स दिले जाईल. यामध्ये 21,700 ते 69,100 पर्यंत पगार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAE Golden Visa confusion: 23 लाखांत मिळतोय लाइफटाइम गोल्डन व्हिसा? युएई सरकारने दिलं स्पष्टीकरण

Goa Crime: पुणेकर पर्यटकाची गोव्यात दादागीरी, गेट बंद केल्याच्या वादातून थेट कारखाली चिरडलं! सुरक्षा रक्षक गंभीर जखमी

ICC Test Rankings: एकाच सामन्यात ४३० धावा करणाऱ्या शुभमन गिलची गरुडझेप; रुटला मागे टाकत संघसहकाऱ्यानं पटकावला अव्वल क्रमांक

Latest Maharashtra News Live Updates: विदर्भात पावसाचा जोर कायम, पुरामुळे बंद झाले 'हे' मार्ग

Mars Rock Auction : मंगळावरून आलेल्या सर्वात मोठ्या उल्कापिंडाचा लिलाव होणार; किंमत तब्बल ३४ कोटी रुपयांपर्यंत, आश्चर्यकारक फोटो पाहा..

SCROLL FOR NEXT