एज्युकेशन जॉब्स

HSC Exam 2024: बारावीच्या परीक्षार्थीना मिळणार 10 मिनिटे जादाचा वेळ पण.. शिक्षण विभागाने दिल्या महत्त्वाच्या सूचना

बारावीच्या परीक्षार्थीना मिळणार १० मिनिटे जादाचा वेळ पण..

Aishwarya Musale

बारावी बोर्डाच्या परीक्षेला राज्यभरात उद्या (बुधवार) पासून सुरूवात होत आहे. परीक्षेसाठी एकुण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपण येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांसाठी समुपदेशक यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

तसेच परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना १० मिनिट वेळ वाढवून देण्यात येणार आहे. परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात २७१ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. सकाळच्या सत्रात १०.३० वाजता तर दुपारच्या सत्रात होणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थी २.३० पर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थितीत असला पाहिजे.

प्रचलित पद्धती प्रमाणे माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार असून या विषयासाठी १,९४,४३९ विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. तसेच ठराविक विषयांसाठी कॅल्क्युलेटर यासाठी परवानगी दिली आहे. मात्र हे कॅल्क्युलेटर मोबाईल किंवा इतर कुठल्या ही यंत्रात नसू नये. विद्यार्थ्यांनी कुठल्याही आणि कोणत्याही गैरप्रकारांच्या प्रलोभनांना बळी पडू नये, शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना आवाहन केलं आहे.

यावर्षी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या

विज्ञान शाखा: ७,६०,०४६

कला शाखा: ३,८१,९८२

वाणिज्य: ३,२९,९०५

वोकेशनल: ३७,२२६

आय टी आय: ४७५०.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

IMD Alert : जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार; माॅन्सून श्रीलंकेवरच रेंगाळला, 7 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता, आयएमडीचा नवा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT