SSC HSC Board exam  Sakal
एज्युकेशन जॉब्स

HSC Exam: बारावीच्या परीक्षेसाठी गुरुवारपर्यंत अर्ज करता येणार

राज्य शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल २०२२ मध्ये बारावीची परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत आयोजित केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावीची परीक्षा येत्या शुक्रवारपासून (ता.४) सुरू होत आहे. या परीक्षेसाठी येत्या गुरुवारी (ता.३) सकाळी अकरा वाजेपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज (आवेदनपत्र) ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्यानंतर अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाने प्रकटनाद्वारे दिली आहे. (HSC Exam Updates)

राज्य शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल २०२२ मध्ये बारावीची परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत आयोजित केली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्क आकारण्यात येऊ नये, विलंब शुल्क माफ करण्यात यावे. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्यादिवशीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे आदेश राज्य सरकारने डिसेंबरमध्ये दिले आहेत.

त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्यादिवशीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा दिली आहे. दिलेल्या मुदतीनंतर मात्र परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे संकेतस्थळ बंद होईल, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

Cultural Heritage: मुसळधार पावसाचा सांस्कृतिक वारशाला तडा! कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

SCROLL FOR NEXT