HSC Result Declare sakal
एज्युकेशन जॉब्स

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

सर्व विभागीय मंडळातून नियमितरीत्या परीक्षा दिलेल्या ९५.४४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांच्या निकालाची टक्केवारी ९१.६० टक्के आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत १४ लाख २३ हजार ९७० नियमित विद्यार्थ्यांपैकी १३ लाख २९ हजार ६८४ म्हणजेच ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला आहे. सर्व विभागीय मंडळातून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.५१ टक्के, तर मुंबई विभागाचा सर्वांत कमी ९१.९५ टक्के निकाल लागला आहे.

राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम व आयटीआय या शाखांसाठी १४ लाख ३३ हजार ३७१ नियमित विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेसाठी नोंदणी केली होती. राज्य मंडळातर्फे २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आली.

सर्व विभागीय मंडळातून नियमितरीत्या परीक्षा दिलेल्या ९५.४४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांच्या निकालाची टक्केवारी ९१.६० टक्के आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८४ टक्क्यांनी जास्त आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. बारावीच्या निकालाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

सर्व शाखांमधून एकूण ४५ हजार ४४८ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४५ हजार ८३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २२ हजार ४६३ विद्यार्थी (४९.८२ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. जवळपास ४० हजार ७९५ खासगी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून ३४ हजार ९८८ विद्यार्थी (८५.७६ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेस सात हजार ३२ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील सहा हजार ९८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, सहा हजार ५८१ विद्यार्थी (९४.२० टक्के) उत्तीर्ण झाले आहेत.

निकालाची वैशिष्ट्ये....

- एकूण १५४ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के

- २१ शिक्षण संस्थांचा शून्य टक्के निकाल

- २ हजार २४६ महाविद्यालयांचा १०० टक्के निकाल

- ८ हजार ७८२ विद्यार्थ्यांना ९० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण

- गैरप्रकारांच्या संख्येत घट

पाच वर्षांतील निकाल

वर्ष : एकूण निकाल (टक्क्यांमध्ये)

२०२० : ९०.६६

२०२१ : ९९.६३

२०२२ : ९४.२२

२०२३ : ९१.२५

२०२४ : ९३.३७

नियमित विद्यार्थ्यांचा निकाल

तपशील : मुले मुली एकूण

नोंदणी झालेले : ७,७१,९२० : ६,६१,४५१ : १४,३३,३७१

परीक्षा दिलेले : ७,६६,६५१ : ६,५७,३१९ : १४,२३,९७०

उत्तीर्ण झालेले : ७,०२,२९६ : ६,२७,३८८ : १३,२९,६८४

उत्तीर्णतेची टक्केवारी : ९१.६० टक्के : ९५.४४ टक्के : ९३.३७ टक्के

शाखानिहाय विद्यार्थ्यांचा निकाल

शाखा : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले : टक्केवारी

विज्ञान : ७,२५,०७७ : ७,०९,३१४ : ९७.८२ टक्के

कला : ३,५१,१४५ : ३,०१,५६६ : ८५.८८ टक्के

वाणिज्य : ३,०७,८७८ : २,८३,८१८ : ९२.१८ टक्के

व्यवसाय अभ्यासक्रम : ३५,१०६ : ३०,८०८ : ८७.७५ टक्के

आयटीआय : ४,७६४ : ४,१७८ : ८७.६९ टक्के

विभागीय मंडळनिहाय निकाल (टक्क्यांमध्ये)

पुणे : ९४.४४

नागपूर : ९२.१२

छत्रपती संभाजीनगर : ९४.०८

मुंबई : ९१.९५

कोल्हापूर : ९४.२४

अमरावती : ९३

नाशिक : ९४.७१

लातूर : ९२.३६

कोकण : ९७.५१

२६८ विद्यार्थ्यांचा निकाल राखून

राज्य मंडळाने तब्बल २६८ विद्यार्थ्यांचा निकाल तांत्रिक कारणाने राखून ठेवला आहे. त्यात पुणे विभागीय मंडळातील २६४ विद्यार्थी आणि छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळातील चार विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला आहे. पुणे विभागीय मंडळांतर्गत सोलापूर जिल्ह्यात परीक्षेदरम्यान एका केंद्रावर आक्षेप नोंदविला होता. त्यातील तांत्रिक बाजूची पडताळणी करण्यासाठी संबंधित केंद्रातील विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला असून लवकरच तो जाहीर करण्यात येईल, असे शरद गोसावी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT