

Delhi Capitals | IPL 2026 Points Table after KKR vs DC
Sakal
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सला ४० धावांनी पराभवाचा धक्का दिला. ईडन गार्डन्सवर मिळवलेला हा विजय दिल्लीचा ७ वा विजय ठरला. त्यामुळे त्यांचे आता १४ गुण झाले आहेत. त्यामुळे त्यांनी कोलकातासह चेन्नई सुपर किंग्सलाही मोठा धक्का दिला आहे.
या सामन्याने आयपीएल २०२६ स्पर्धेतील साखळी फेरी संपली. या सामन्यापूर्वीच दिल्ली आणि कोलकाताचे आव्हान संपले होते. पण दोन्ही संघ प्रतिष्ठेसाठी खेळत होते.