

Riyan Parag | MI vs RR | IPL 2026
Sakal
MI vs RR Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) राजस्थान रॉयल्सने रविवारी (२४ मे) मुंबई इंडियन्सला वानखेडे स्टेडियमवर ३० धावांनी पराभूत केलं. हा विजय राजस्थानसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला, कारण यामुळे त्यांना प्लेऑफमध्ये जागा मिळाली. राजस्थानचा हा ८ वा विजय होता.
त्यामुळे राजस्थान प्लेऑफमध्ये (Rajasthan Royals Qualify for Playoff) पोहणारा चौथा संघ ठरला. मात्र यामुळे पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या आशा संपवल्या. कोलकाता रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभूत झाले, त्यामुळे ते १५ गुणांपर्यंत पोहचलेच नाही. मात्र पंजाबचे १५ गुण होते, त्यांना प्लेऑफमध्ये जाण्यासाठी राजस्थान मुंबईविरुद्ध हरणं गरजेचं होतं. पण राजस्थानने विजय मिळवल्याने पंजाबचे आव्हान संपले.
राजस्थानच्या या विजयात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) अत्यंत महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही योगदान दिले. त्यामुळे तो सामन्यातील सामनावीर ठरला.