journalist  Sakal
एज्युकेशन जॉब्स

HSC Result : पत्रकार व्हायचंय? 12वी नंतर काय कराल? वाचा एका क्लिकवर

Career in Journalism: बारावीचा निकाल लागल्यानंतर पत्रकारितेत करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पात्रता, अभ्यासक्रम, माध्यमांची माहिती आणि उपलब्ध नोकरीच्या संधींचा सविस्तर आढावा

Puja Bonkile

How to become a Journalist: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच बारावीचा निकाल जाहीर केला आहे. बारावीच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. बारावी झाली की विद्यार्थांच करिअर नवं वळण घेतं. तुम्हाला जर पत्रकार व्हायचे त्यासाठी कोणती पात्रता असते, अभ्यासक्रम कोणता असतो आणि त्यात संधी कोणत्या आहेत हे सांगणार आहोत.

पत्रकार हा समाजातील घटना सामान्य लोकांना सोप्या शब्दात सांगण्याच काम करतो. तसेच सरकार आणि समान्य जनतेमधला दुवा मानला जातो. कारण सामान्य लोकांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्याच काम पत्रकार करतो. यासाठी वृत्तपत्र, रेडिओ, टेलिव्हिजन आणि आता सोशल मिडिया या प्रमुख माध्यांचा वापर करतो. पत्रकारितेची पदवी घेऊन त्यात करिअर करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी बॅचलर ऑफ जर्नालिजम ही पत्रकारितेची पदवी प्राप्त करावी लागते.

पत्रकार होण्यासाठी कोणती पात्रता

  • विद्यार्थ्याने कोणत्याही शाखेत बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

  • राज्यस्तरावरील कोणतीही सीईट या प्रवेशासाठी नाही.

  • पण काही संस्था त्यांच्या स्तरावर प्रवेश परिक्षा घेऊ शकतात.

  • बारावीनंतर तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम आहे.

  • मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमांमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

  • तसेच मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांवर प्रभूत्व असावे.

अभ्यासक्रमातील विषय

पत्रकारितेची ओळख, भाषांवर प्रभूत्व, अर्थशास्त्र,समाजशास्त्र, प्रशासन यांची सविस्तर माहिती,पत्रकारितेचा इतिहास आणि वाटचाल, बातमीचा शोध, वार्तालेखन,वार्तांकन, संपादन, वृत्तनिवेदन,प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, फोटोजर्नालिजम,क्राईम रिपोर्टिंग,पत्रकारितेशी संबंधित संस्थांचा अभ्यास अग्रलेख, जाहिराशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा अभ्यास पत्रकारितेमध्ये शिकविला जातो.

नोकरीची संधी

तुम्ही पदवी प्राप्त झाल्यावर पत्रकार,वृत्तनिवेदक,प्रुफरीडर, स्तंभ लेखक, कटेंट रायटर, सहसंपादक,संपादक अशा अनेक संधी मिळतात. तुम्हाला जर आवड असेल तर या क्षेत्रात यश मिळवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT