NDA google
एज्युकेशन जॉब्स

HSC result : बारावीनंतर थेट संरक्षण दलांचे प्रशिक्षण घ्या

आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही संरक्षण दलामध्ये कार्य करणारे अधिकारी तयार करण्याचे काम राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (नॅशनल डिफेन्स अकॅडमी, एनडीए) पुणे करते.

नमिता धुरी

मुंबई : एनडीएमधील प्रशिक्षणाची निवड तीन टप्प्यांमधून होत असते. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी हे ते तीन टप्पे होत. पदवी अभ्यासक्रमाची तीन वर्षे आणि विशेष अभ्यासक्रमाचे एक वर्ष असे एकूण चार वर्षांचे प्रशिक्षण एनडीएमध्ये मिळते.

देशाला सामरिकदृष्ट्या बलशाली बनवण्यासाठी भारतीय संरक्षण विभागाला धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात. राष्ट्रीय संरक्षणाच्या धोरणात्मक निर्णयानुसार सशस्त्र सेना संरक्षण उत्पादन विभाग आणि डीआरडीओ हे विभाग कार्यरत आहेत.

भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत भारतीय सशस्त्र सेना (Indian Armed Forces), संरक्षण उत्पादन विभाग (Department of Defence production) आणि संरक्षण संशोधन व विकास संस्था (Defence Research and Development Organisation) या तीन विभागांमध्ये एनडीए च्या माध्यमातून प्रवेश मिळवता येतो.

आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही संरक्षण दलामध्ये कार्य करणारे अधिकारी तयार करण्याचे काम राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (नॅशनल डिफेन्स अकॅडमी, एनडीए) पुणे करते. अशा प्रकारचे अधिकारी घडवणारी देशातील एकमेव अशी संस्था जी महाराष्ट्रामध्ये आहे.

बारावीनंतर एनडीएमध्ये प्रवेश मिळतो. यासाठी देशपातळीवर घेण्यात येणारी एनडीए प्रवेश परीक्षा द्यावी लागते. UPSC एनडीए प्रवेश परीक्षा घेत असते.

केंद्रीय लोकसेवा आयोग NDA परीक्षा कधी असते ?

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत वर्षातून दोन वेळा एनडीए परीक्षा घेण्यात येत असते. ही परीक्षा एप्रिल आणि सप्टेंबर महिन्यामध्ये होत असते. ज्यासाठी सामान्यतः जून आणि डिसेंबरमध्ये फॉर्म भरण्यासंदर्भात नोटिफिकेशन येते.

एनडीए मधील प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड तीन टप्प्यांमधून होत असते.

  • केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा

  • सर्विसेस सेलेक्शन बोर्ड मुलाखत

  • वैद्यकीय चाचणी

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून एनडीए परीक्षा बहुपर्यायी वैकल्पिक स्वरूपाची असते यामध्ये दोन पेपर असतात.

  • पेपर 1 गणित

  • पेपर 2 सामान्य क्षमता चाचणी

गणिताचा पेपर 1 – ३०० गुणांचा असतो तर सामान्य क्षमता चाचणी हा पेपर क्रमांक 2 – ६०० गुणांचा असतो. अशाप्रकारे ९०० गुणांसाठी एन डी ए परीक्षा आयोजित केली जाते.

महाराष्ट्रामध्ये मुंबई व नागपूर या केवळ दोनच केंद्रावर एनडीए प्रवेश परीक्षा आयोजित केली जाते.

एअरफोर्स व नेव्ही साठी प्रवेश मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

एनडीए वयोमर्यादा – ज्या उमेदवारांचे वय १६.५ ते १९ वर्षे दरम्यान आहे असे उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

सर्विसेस सेलेक्शन बोर्ड मुलाखत –

लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना सर्विसेस सेलेक्शन बोर्ड द्वारे आयोजित करण्यात येणारी मुलाखत द्यावी लागते. या मुलाखतीमध्ये मानसिकता चाचणी, समूह कामगिरी आणि वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश होतो. सदर मुलाखत ९०० गुणांची असते.

वैद्यकीय चाचणी –

मुलाखत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी आयोजित केली जाते सेना वैद्यकीय अधिकारी बोर्ड यांच्याकडून वैद्यकीय चाचणी घेण्यात येते.

या नंतर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मुख्यालय मुलाखत व वैद्यकीय चाचणी च्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी बनवतात आणि उपलब्ध जागा नुसार उमेदवारांना एनडीए प्रशिक्षणासाठी निवड झाल्याचे पत्र पाठवतात.

एनडीए प्रशिक्षण

बावीस आठवड्यांचे एक अशाप्रकारे सहा सत्रांमध्ये तीन वर्षांचा जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा पदवी अभ्यासक्रम उमेदवारांकडून करून घेतला जातो. या पदवी अभ्यासक्रमानंतर उमेदवार आपापल्या सेवेनुसार पुढील विशेष प्रशिक्षणासाठी नियुक्त होतात.

  • आर्मी कॅडेट इंडियन मिलिटरी अकॅडमी , डेहराडून

  • नेव्ही कॅडेट इंडियन नेव्हल अकॅडमी, कोची

  • एअरफोर्स केडिट इंडियन एअर फोर्स अकॅडमी, हैदराबाद

उमेदवारांना आपापल्या विभागानुसार वरील अकॅडमी मध्ये विशेष प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. विशेष प्रशिक्षणानंतर उमेदवार भारतीय सशस्त्र सेनेत कमिशनर ऑफिसर बनतो.

पदवी अभ्यासक्रमाचे तीन वर्ष आणि विशेष अभ्यासक्रमाचे एक वर्ष असे एकत्रित चार वर्षांचे प्रशिक्षण एनडीए मध्ये मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: ऋतुराज गायकवाड कर्णधार, पृथ्वी शॉही महाराष्ट्र संघात; पहिल्याच सामन्यात शुभमन-अभिषेकच्या संघाला भिडणार

Ahilyanagar Crime: 'जामखेड गोळीबारातील तीन आरोपी जेरबंद'; गावठी पिस्तूल व काडतुसे हस्तगत

Maharashtra Nagaradhyaksha Results 2025 : राज्यात भाजपा १ नंबरचा पक्ष, कोणत्या पक्षाचे किती उमेदवार विजयी? वाचा विभागनिहाय यादी...

धक्कादायक घटना! 'मुलाकडूनच वडिलांचा डोक्यात दगड घालून खून'; मंगळवेढा तालुक्यातील घटना, भलतचं सत्य आलं समाेर..

IND vs PAK U19, Final: वैभव सूर्यवंशी - आयुष म्हात्रे पाकिस्तानी खेळाडूंना भिडले; विकेट्सनंतर घडली चकमक; Video Viral

SCROLL FOR NEXT