Student sakal media
एज्युकेशन जॉब्स

अखेर मुहूर्त मिळाला... बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार!!

अखेर मुहूर्त मिळाला... बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार!! शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली घोषणा HSC Results Maharashtra State Board will be declared on 3 august 2021 at 4 pm

विराज भागवत

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली घोषणा

मुंबई: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा (Maharashtra State Board) दहावीचा निकाल (SSC Results) लागल्यानंतर बारावीचा निकाल (HSC Results) कधी लागणार याकडे साऱ्यांचेच लक्ष होते. बारावीचा निकाल कधी लागणार याची सर्वत्र चर्चा (Discussion) सुरू होती. अखेर बारावीच्या निकालाची तारीख (Dates Declared) जाहीर झाली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा म्हणजेच स्टेट बोर्डचा (State Board) बारावीचा निकाल ३ ऑगस्टला संध्याकाळी ४ वाजता लागणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी ट्विटच्या (Tweet) माध्यमातून केली. "महत्त्वाची सूचना: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये मंडळाच्या कार्यपद्धती नुसार तयार करण्यात आलेला इ.१२वीचा निकाल उद्या दि.०३ ऑगस्ट,२०२१ रोजी दु.४:०० वा. जाहीर होईल. सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा!", असे ट्विट करत वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.

परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण पुढील संकेतस्थळावर उद्या दुपारी ४ नंतर उपलब्ध होतील.

१. https://msbshse.co.in

२. https://hscresult.11thadmission.org.in

३. http://hscresult.mkcl.org

४. http://mahresult.nic.in

५. https://lokmat.news18.com

तसेच, उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल http://mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. त्यासह, सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत इ.१२वी निकालासाठी सुधारित अंतर्गत मूल्यमापन प्रक्रियेत परीक्षा मंडळांचा मोठा वाटा असून त्यात शिक्षकांनी मोलाची भूमिका बजावली. ह्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आणि सहकार्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते!, असेही ट्विट त्यांनी केले आहे.

निकालाचा फॉर्म्युला काय?

दहावी, अकरावी आणि बारावी अशा तीन वर्गांचे गुण विचारात घेऊन बारावीतील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. दहावी आणि अकरावीच्या लेखी परीक्षांचे प्रत्येकी 30 टक्के तर बारावीचे 40 टक्के गुण गृहित धरण्यात येणार आहेत. याशिवाय, बारावीचे अंतिम तोंडी परीक्षेचे गुणही विचारात घेतले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT