jOBS
jOBS 
एज्युकेशन जॉब्स

सरकारी बँकांमध्ये नोकरीची संधी; पदवीधरही करु शकतात अर्ज

शर्वरी जोशी

लॉकडाउनच्या काळात अनेकांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. मात्र, अशा तरुणांना आता नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. जर तुम्ही अकाऊंट्स किंवा बँकिंग क्षेत्रात नोकरी करु इच्छिता तर तुमच्यासाठी सध्या सुर्वणसंधी आहे. बँकांमध्ये क्लार्क पदासाठी इंस्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनद्वारे (IBPS) परीक्षा घेण्यात येणार आहेत. या आयबीपीएस परिक्षेच्या (IBPS Exam) माध्यमातून देशातील वेगवेगळ्या सरकारी बँकांमधील क्लार्कची रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे ही परीक्षा पदवीधरदेखील देऊ शकतात. (ibps-clerk-recruitment-2021-bank-job-vacancy-for-graduate)

आयबीपीएस एक्झाम कॅलेंडर २०२१ नुसार, क्लार्क पदासाठीची ही परीक्षा ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. त्यापूर्वी २८ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२१ रोजी प्रिलिअम एक्झाम घेण्यात येईल. त्यानंतर ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी क्लार्क पदाची मुख्य परिक्षा घेतली जाईल.

IBPS Clerk परिक्षेसाठी पात्रता -

यूजीसी (UGC) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातील पदवी असलेले तरुण या पदांसाठी अर्ज करु शकतात. तसंच जे पदवीच्या शेवटच्या वर्षात आहेत. ते विद्यार्थीदेखील अप्लाय करु शकतात. योग्य पद्धतीने परिक्षा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला IBPS Clerk साठी प्रिलिअम एक्झाम द्यावी लागेल. या प्रिलिअममध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवार IBPS Clerk Mains परीक्षा देऊ शकतात.

IBPS Clerk Recruitment 2021 साठी कसा करावा अर्ज?

या परीक्षेसाठी प्रथम तुम्हाला IBPS च्या ibps.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तिथे ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

अर्ज केल्यानंतर IBPS च्या मेन पेजवर येऊन CRP Clerk XI ही नवीन लिंक मिळेल. त्यावर क्लिक करा.

CRP Clerk XI वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन आणि अप्लाय करण्याची नवीन लिंक मिळेल.

ही लिंक अॅक्टिव्ह झाल्यावर तुम्ही रजिस्ट्रेशन व अर्ज करु शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Latest Marathi News Update: उत्तराखंडच्या जंगलातील आगीच्या घटनांबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

SCROLL FOR NEXT