MPSC esakal
एज्युकेशन जॉब्स

MPSC Typist Recruitment : एमपीएससीकडून टंकलेखक भरतीसंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लिपिक-टंकलेखक पदाच्या भरती संदर्भात तीन महत्त्वपूर्ण निर्णय घोषीत केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लिपिक-टंकलेखक पदाच्या भरती संदर्भात तीन महत्त्वपूर्ण निर्णय घोषीत केले आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, राज्यस्तरावर एकच कट ऑफ घोषीत करण्यात आला आहे.

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त (पूर्व) परीक्षा २०२३ मधील लिपिक-टंकलेखक (मराठी किंवा इंग्रजी) पदाचा निकाल जाहीर केला. जवळपास चार महिन्यानंतर निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे. निकाल जाहीर करताना आयोगाकडून राज्यस्तरावर एकच कटऑफ लावला आहे. तसेच बारा पटीत ८४ हजार ४०८ विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील, असे अपेक्षित होते.

मात्र, आयोगाने ९५ हजार ५४७ विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पात्र ठरविले आहे. आयोगाने लावलेल्या निकालात पहिल्यांदाच कटऑफ १९ गुणांपर्यंत खाली आणण्यात आला आहे. त्यामुळेच अधिक विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यापुर्वीचा खुल्या गटासाठीचा कटऑफ ४० च्या पुढे होता, असे विद्यार्थ्यांकडून सांगितले जात आहे. हे तीन निर्णय विद्यार्थ्यांना दिलासा देणारे ठरले आहेत.

अशी होती उमेदवारांची मागणी -

- गट ब आणी क संवर्गातील ८ हजार १६९ विविध पदांसाठी पूर्व परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी लिपिक-टंकलेखक संवर्गातील ७ हजार ३४ पदासाठी परीक्षा झाली.

- लिपिक-टंकलेखक पदासाठी विभाग प्राधिकारीनिहाय कट ऑफ लावण्यात येणार होता. एकूण २४ शासकीय विभागांची पदे असून २८० पोट विभाग किंवा प्राधिकरण आहेत.

- उमेदवार अर्ज करताना या २८० प्राधिकरणांपैकी किमान एक किंवा सर्व २८० प्राधिकरण विकल्प म्हणून सिलेक्ट करू शकतात.

- त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी लागणारा कट ऑफ कमालीचा वाढेल व हजारो विद्यार्थाच्या मुख्य परीक्षा देण्याच्या संधी नाहकपणे हिरावल्या जातील, अशी भीती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT