CBSE Board esakal
एज्युकेशन जॉब्स

CBSE Board : शाळांनी अंतर्गत मूल्यांकन प्रक्रियेची पुनर्तपासणी करावी; CBSE ची परीक्षांबाबत महत्त्वाची सूचना

गेल्या काही वर्षात दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचे गुण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सीबीएसईने दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये (10th-12th Exam) विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचे, निकालाच्या सांख्यिकी माहितीचे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनाचा वापर करून विश्लेषण केले.

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) परीक्षेच्या निकालात विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या प्रमाणात बरीच तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शाळांनी त्यांच्या अंतर्गत मूल्यांकन प्रक्रियेची पुनर्तपासणी करावी, अशी सूचना सीबीएसईने दिली आहे.

सीबीएसईने दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये (10th-12th Exam) विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचे, निकालाच्या सांख्यिकी माहितीचे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनाचा वापर करून विश्लेषण केले. यात ही बाब निदर्शनास आली. गेल्या काही वर्षात दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचे गुण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या या विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे.

त्या अनुषंगाने सीबीएसईने प्रगत कृत्रिम बुद्धीमत्ता साधनांद्वारे गेल्या वर्षीच्या निकालांच्या माहितीच्या आधारे केलेल्या विश्लेषणात सीबीएसईशी संलग्न पाचशे शाळांमध्ये ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या काही विषयांच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षेतील गुणांमध्ये फरक आढळला आहे, अशी माहिती  सीबीएसईने परिपत्रकाद्वारे दिली आहे.

विश्लेषणात आढळून आलेल्या तफावतीमुळे शाळांनी प्रात्यक्षिक परीक्षांचे मूल्यमापन अधिक बारकाईने करण्याची गरज सीबीएसईने अधोरेखित केली आहे. त्यासाठी शाळांनी अंतर्गत मूल्यांकन प्रक्रियेची पुनर्तपासणी करण्याची आवश्यकता आहे. अंतर्गत मूल्यमापन प्रक्रिया वास्तववादी आणि विश्वासार्ह असावी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये महत्त्वपूर्ण भर घालत असल्याची खात्री देणे, हा यामागील उद्देश आहे. प्रात्यक्षिक परीक्षांचे मूल्यमापन योग्य पद्धतीने आणि अचूक होण्यासाठी या सूचना उपयुक्त ठरतील, असे सीबीएसईने परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

FIFA World Cup: आधी संघाचा पराभव अन् पत्रकार परिषदेत कोचला मिळाली वडिलांच्या निधनाची बातमी; Video

Escort Allowance Scheme: शाळेत येण्या-जाण्यासाठी मिळणार सरकारी भत्ता; दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी UP सरकारची संवेदनशील योजना

Latest Marathi News Live Update : तिकिटाच्या वादातून एसटी वाहकाला बेदम मारहाण; हिंगोली डेपो बंद ठेवत कर्मचाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT