India Post  esakal
एज्युकेशन जॉब्स

पोस्टात नोकरीची मोठी संधी! 7 व्या वेतन आयोगांतर्गत मिळणार 'इतका' पगार

सकाळ डिजिटल टीम

पोस्ट विभागात नोकरी (India Post Jobs) मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध झालीय.

India Post Recruitment 2021 : पोस्ट विभागात नोकरी (India Post Jobs) मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध झालीय. टपाल विभाग, नवी दिल्ली यांच्यातर्फे कुशल कारागीर, सामान्य केंद्रीय सेवा ग्रेड C व इतर पदांच्या भरतीसाठी नुकतीच अधिसूचना जारी करण्यात आलीय. दरम्यान, पात्र उमेदवार 11 डिसेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.

या भरती मोहिमेंतर्गत (Dak vibhag Bharti 2021) मोटर वाहन मेकॅनिक, मोटर वाहन इलेक्ट्रिशियन, टायरमन, पेंटर, फिटर, कॉपर अॅण्ड टिन स्मिट आणि अपहोल्स्टर या पदांवर भरती केली जाणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवाराला अधिकृत वेबसाइटला indiapost.gov.in भेट द्यावी लागेल. तसेच अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 डिसेंबर 2021 पर्यंत आहे.

रिक्त पदांचा तपशील

  • मोटर वाहन मेकॅनिक - 06 पदे

  • मोटार वाहन इलेक्ट्रिशियन - 02 पदे

  • टायरमन - 03 पदे

  • पेंटर - 02 पदे

  • फिटर - 02 पदे

  • कॉपर अॅण्ड टिन स्मिट - 01 पद

  • अपहोल्स्टर - 01 पद

इतका मिळेल पगार : पोस्टाच्या अधिसूचनेनुसार, भरतीमध्ये समाविष्ट असलेल्या रिक्त पदांवर नोकरी मिळवणाऱ्या उमेदवारांना 7 व्या वेतन आयोग (7th CPC) वेतन स्तर -2 अंतर्गत 19900 ते 63200 रुपयांपर्यंत वेतन दिलं जाईल.

कोण करू शकतो अर्ज?

Delhi Post Office च्या सूचनेनुसार, उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाचे स्वरूप यासह इतर महत्वाच्या माहितीसाठी तपशीलवार अधिसूचनेची प्रतीक्षा करावी लागेल. अधिसूचना लवकरच इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT