Skill-Development-Jobs 
एज्युकेशन जॉब्स

Report : देशात रोजगारक्षम तरुणांची संख्या पन्नास टक्क्यांहून कमी!

रोजगारासाठी किमान कौशल्ये पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : India Skill Report २०२२ : नोकऱ्यांची कमी, बेरोजगारी, कौशल्याचा अभाव यामुळं निर्माण झालेली बेरोजगारीची समस्या आपल्यासाठी नवी नाही. त्यातच आता इंडिया स्किल्स रिपोर्ट २०२२ नुसार भारतात रोजगारांची कौशल्य आत्मसात केलेल्या तरुणांची संख्या ही केवळ ४८.७ टक्के आहे. यावरुन हे लक्षात येतंय की, भारतातील दोन पैकी एक तरुण रोजगार मिळवण्यास सक्षम नाही. व्हिबॉक्सद्वारे जाहीर करण्यात आलेल्या या अभ्यासात सहभागी असलेल्या कंपन्यांमध्ये सुमारे ७५ टक्के उद्योगात कौशल्याचा अभाव असल्याचं दिसून आलं आहे.

एक ते पाच वर्षांचा अनुभव असलेल्या तरुणांना मागणी

रिपोर्टनुसार, बीटेक आणि एमबीएच्या विद्यार्थ्यांमध्ये अधिक रोजगारक्षम कौशल्ये आहेत. एक ते पाच वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना मोठी मागणी आहे. तसेच जर आपण गेल्या सात-आठ वर्षांबाबत बोलायचं झाल्यास त्या काळात रोजगार योग्यता ३४ ते ४६.२ टक्के होती. २०२० नंतर प्रत्येक वर्षी उच्च शिक्षण घेणारे भारतीय उमेदवारांमध्ये रोजगार क्षमता सुधारली असल्याचं दिसून आलं आहे.

५१.४४ टक्के महिला रोजगार योग्य

देशात कमाल रोजगारयोग्य वयाची मर्यादा २२ ते २५ वर्षे आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, केरळ आणि पश्चिम बंगाल सारख्या राज्यातून सर्वाधिक जास्त रोजगार योग्य तरुण येतात. यामध्ये कामासाठी निवड होणाऱ्या यादीत महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू ही राज्ये सर्वात वर आहेत. परंतू दुर्दैवाची गोष्ट ही आहे की, भारतात वर्कफोर्समध्ये केवळ ३२.८ टक्के महिलांचा देखील समावेश आहे. पण महत्वाची गोष्ट अशी की ५१.४४ टक्के महिला रोजगारक्षम आहेत. तर रोजगारक्षम पुरुषांची संख्या ४५.९७ टक्के आहे. तेलंगाणा आणि कर्नाटकात सर्वाधिक नोकऱ्यांसाठी महिला तयार आहेत. ३५.९६ टक्के कंपन्यांमध्ये महिलांचं प्रमाण मोठं आहे.

इंडिया स्कील रिपोर्ट २०२२

इंडिया स्कील रिपोर्ट २०२२ हा संपूर्ण भारतात ३ लाख उमेदवारांद्वारे करण्यात आलेल्या व्हीबॉक्स नॅशनल इलिजिबिलीटी टेस्टचे (WNET) परिणाम आणि १५ उद्योग आणि क्षेत्रात पसरलेल्या १५० कॉर्पोरेट्समध्ये समाविष्ट असलेल्या इंडिया हायरिंग इंटेंट सर्व्हेच्या रिपोर्टवर आधारित आहे. भारत कौशल्य रिपोर्ट अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद (AICTE), भारतीय विद्यापीठ संघ (AIU), भारतीय उद्योग परिसंघ (CII) आदींसोबत करार असून त्याचा हा वार्षिक रिपोर्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : शफाली वर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! पाकिस्तानला पहिल्याच चेंडूवर जागा दाखवली; जगात भारी कामगिरी केली Video Viral

DCM Sunetra Pawar : हजार शाळा ‘मॉडेल स्कूल’बनविणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

India China Strategy: चीनच्या तुलनेत भारताची तंत्रज्ञान क्षमता वाढविण्याची गरज; ‘चायना कॉन्फरन्स २०२६’मध्ये तज्ज्ञांचा सूर

Sangramdurg Ground Fort : ‘संग्रामदुर्ग’चा दोनशे वर्षांपूर्वीचा नकाशा पुरातत्त्व विभागाकडे मिळाला

Narendra Modi: मोदींचा राहुल गांधींवर हल्ला! म्हणाले, त्यांचा एकच पेटंट डायलॉग असतो.. 'याची काय गरज होती?'

SCROLL FOR NEXT