Indian Air Force officials during a recruitment drive for Group Y Medical Assistant Trade – a golden opportunity for 12th pass youth in 2025.  esakal
एज्युकेशन जॉब्स

Air Force Recruitment 2025 : बारावी पास विद्यार्थ्यांसाठी हवाई दलात सामील होण्याची ‘सुवर्ण संधी’ !

Indian Air Force recruitment 2025 for 12th pass candidates : जाणून घ्या, नेमकं कोणत्या पदासाठी आहे भरती, वेतन किती मिळणार? अन् वयोमर्यादा, शारीरिक क्षमता पात्रता काय असणार?

Mayur Ratnaparkhe

Indian Air Force Group Y Recruitment 2025 : भारतीय हवाई दलात सामील होण्याची सुवर्ण संधी इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी निर्माण झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात करियर करायचे आहे, त्यांनी ही मोठी संधी सोडू नये. भारतीय हवाई दलाने एअरमन ग्रुप वाय नॉन टेक्निकल मेडिकल असिस्टंट ट्रेड(एअरमन इनटेक ०२/२०२६)च्या भरतीची घोषणा केली आहे.

 या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइटवर १ जुलैपासून अर्ज सुरू होतील indianairforce nic in. ज्यामध्ये उमेदवार ११ जुलैपासून अर्ज करू शकतील. शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ आहे. या कालावधीत इच्छुकांना अर्ज दाखल करता येणार आहे.

भारतीय वायुसेना वैद्यकीय सहाय्यक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून किमान ५० टक्के गुणांसह भौतिकशास्त्र / रसायनशास्र / जीवशास्र किंवा इंग्रजीसह बारावी उत्तीर्ण / इंटरमिजिएट / समकक्ष पात्रात असणे आवश्यक आहे.

याशिवाय उमेदवारांनी दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम आणि ५० टक्के गुणांसह फार्मसीमध्ये डिप्लोमा / बी.एससी पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. याशिवाय राज्य फार्मसी कॉन्सिल किंवा भारती फार्मसी कॉन्सिलकडे वैध नोंदणी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार अविवाहित असणेही आवश्यक आहे.

वयोमर्यादा – वैद्यकीय सहाय्यक पदासाठी उमेदवाराची जन्मतारीख २ जुलै २००५ ते २ जुलै २००९ दरम्यान असावी. दोन्ही तारखा ग्राह्य धरल्या जातील. तसेच, जर उमेदवाराने निवड प्रक्रियेचे सर्व टप्पे उत्तीर्ण केले तर बारावी/समतुल्य उमेदवारांसाठी कमला वयोमर्यादा २१ वर्षे असेल आणि डिप्लोमा/बी एससी फार्मसीसाठी वयोमर्यादा २४ वर्षांपर्यंत असेल.

उंची  - वैद्यकीय सहाय्यक आणि वैद्यकीय सहाय्यक  फार्मसिस्टसाठी उमेदवाराची उंची किमान १५२ सेमी असावी, तसेच छातीचे माप ७७ सेमी असावे जे ५ सेमी पर्यंत वाढले पाहीजे. याचबरोबर वजन हे उंचीला अनुरूप असणे आवश्यक आहे.

वेतन – प्रशिक्षणादरम्यान उमेदवारास दरमहा १४ हजार ६०० रुपये मिळतील. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना दरमहा २६ हजार ९०० रुपये वेतन दिले जाईल. तसेच इतर प्रकरचे भत्ते आणि सुविधाही दिल्या जातील.

निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी, शारीरिक, वैद्यकीय चाचणी इत्यादी टप्प्यांद्वारे केली जाईल.

अर्ज शुल्क – ऑनलाइन नोंदणीसाठी उमेदवारांना ५५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

ऑनलाइन लेखी परीक्षेचा कालावधी ४५ मिनिटे असेल, यामध्ये इंग्रजी, लॉजिकल रिझनिंग आणि सामान्य ज्ञान या विषयांवरून प्रश्न विचारले जातील. योग्य उत्तरासाठी एक गुण असेल आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केली जातील.

शारीरिक क्षमता – २१ वर्षांच्या उमेदवारांना शारीरिक तंदुरुस्ती चाचणीमध्ये ७ मिनिटांत १.६ किमी धावावे लागेल. तर २१ वर्षांवरील डिप्लोमा/बीएससी उमेदवारांना ७ मिनटे ३० सेकंद दिले जातील. या भरतीसंबंधी अन्य माहितीसाठी इच्छु उमेदवार भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देवू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Development : पुण्याच्या प्रश्नांचा विधानसभेत आवाज, आमदारांकडून उपाययोजनांची मागणी; वाहतूक कोंडीसह अतिक्रमणे हटवावीत

Ashadhi Wari 2025: 'जो तरुण भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात'; आधुनिक वाद्यांसह भारुडकार कृष्णा महाराज यांची भारुडसेवा

Gadchiroli Education: गडचिरोलीचे शिक्षणाधिकारी पोलिसांना शरण; बोगस शिक्षक पराग पुडकेचा प्रस्ताव केला होता मंजूर

ख्रिश्चन आक्रमक! आमदार पडळकरांचे ख्रिश्चन धर्माबद्दल अवमानकारक वक्तव्य; मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा

Pune News : आपत्तींमुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ; लष्करी अभियंत्यांच्या कामगिरीचेही कौतुक

SCROLL FOR NEXT