agnipath google
एज्युकेशन जॉब्स

Indian Army Agniveer Bharti : अग्निवीर भरतीसाठी नोंदणी सुरू

ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात, भारतीय सैन्यात पहिल्या टप्प्यात २५ हजार अग्निवीरांच्या भरतीसाठी देशभरात ८० रॅली काढण्यात येणार आहेत.

नमिता धुरी

मुंबई : अग्निपथ (Indian Army Agniveer Bharti 2022) योजनेंतर्गत भारतीय सैन्यात अग्निवीर भरतीसाठी आजपासून नोंदणी सुरू झाली आहे. joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात, भारतीय सैन्यात पहिल्या टप्प्यात २५ हजार अग्निवीरांच्या भरतीसाठी देशभरात ८० रॅली काढण्यात येणार आहेत. रॅलीमध्ये यशस्वी झालेले उमेदवार लेखी परीक्षेत भाग घेतील. १६ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा होणार आहे. यानंतर डिसेंबरमध्ये निवडलेले २५ हजार अग्निवीर प्रशिक्षणासाठी जाणार आहेत.

पदांची नावे

ही भरती ६ पदांसाठी असेल, ज्यासाठी पात्रता वेगळी आहे.

अग्निवीर जनरल ड्युटी

अग्निवीर तांत्रिक

अग्निवीर तांत्रिक (एव्हिएशन/म्युनिशन टेस्टर)

अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल

अग्निवीर ट्रेड्समन १०वी पास

अग्निवीर ट्रेड्समन आठवी पास

पात्रता

जनरल ड्युटीसाठी, उमेदवार ४५ गुणांसह १०वी उत्तीर्ण असावा.

अग्निवीर टेक्निकल (एव्हिएशन/म्युनिशन टेस्टर) साठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी विषयांसह १२वी उत्तीर्ण ५० टक्के गुणांसह.

लिपिक/स्टोअरकीपर पदांसाठी उमेदवाराला ६० टक्के गुणांसह १२वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. तसेच इंग्रजी आणि गणितात ५० टक्के गुण आवश्यक आहेत.

ट्रेड्समनसाठी १०वी आणि ८वी उत्तीर्ण उमेदवारांची स्वतंत्र भरती केली जाईल.

वय मर्यादा

उमेदवारांची वयोमर्यादा १७.५ ते २३ वर्षे दरम्यान असावी.

पगार

लष्कराने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अग्निवीरच्या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पहिल्या वर्षी ३० हजार रुपये, दुसऱ्या वर्षी ३३ हजार रुपये, तिसऱ्या वर्षी ३६ हजार ५०० आणि चौथ्या वर्षी ४० हजार रुपये वेतन आणि भत्ते दिले जातील. सोबतच विसर्जनाच्या वेळी सेवा निधीही दिला जाणार आहे.

निवड अशी होईल

उमेदवारांच्या भरतीसाठी मेळावे घेतले जातील, शारीरिक मोजमाप होईल. यासाठी वैद्यकीय चाचणी होणार आहे. या टप्प्यातील यशस्वी उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल.

भारतीय सैन्य अग्निवीर भरती : नोंदणी कशी करावी

सर्वप्रथम joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या अग्निपथ सेक्शनवर क्लिक करा.

आता User Registration वर क्लिक करा.

विनंती केलेली सर्व माहिती भरून नोंदणी करा.

आता लॉगिन करा आणि अर्ज भरा.

कागदपत्रे अपलोड करा.

अर्ज फी भरा.

सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील निवडणूक मोदी शाहांनी आपल्यावर घेतली : आशुतोष रांका

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT