Indian Army Recruitment 2022 esakal
एज्युकेशन जॉब्स

भारतीय सैन्यात 'या' पदांसाठी भरती; लेखी परीक्षेशिवाय होणार निवड

सकाळ डिजिटल टीम

भारतीय सैन्यात नोकरीसाठी इच्छुक असलेल्या तरुणांकरिता एक आनंदाची बातमी आहे.

Indian Army Recruitment 2022 : भारतीय सैन्यात (Indian Army) नोकरीसाठी (Government Jobs) इच्छुक असलेल्या तरुणांकरिता एक आनंदाची बातमी आहे. भारतीय लष्करानं अलीकडेच 8 मार्च रोजी पुरुष उमेदवारांसाठी 59 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) आणि महिला उमेदवारांसाठी 30 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) प्रवेशाची जाहिरात प्रसिद्ध केलीय. या 191 पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरू झालीय. दरम्यान, उमेदवार 6 एप्रिल 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार भारतीय लष्कराच्या अधिकृत joinindianarmy.nic.in वेबसाइटद्वारे आपला अर्ज करू शकतात.

कोण अर्ज करू शकतो?

इंडियन आर्मीच्या एसएससी भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच उमेदवारांची निवड झाल्यास त्यांना 1 ऑक्टोबर 2022 पर्यंत पदवीची प्रत सादर करावी लागेल. 1 ऑक्टोबर 2022 रोजी उमेदवारांचं वय 20-27 वर्षे असावं. याचाच अर्थ उमेदवाराचा जन्म 2 ऑक्टोबर 1995 पूर्वी झालेला नसावा आणि 1 ऑक्टोबर 2002 नंतर झालेला नसावा.

लेखी परीक्षेशिवाय होणार निवड

इंडियन आर्मीच्या SSC भरतीसाठी उमेदवारांची निवड सेवा निवड मंडळाद्वारे (Services Selection Board) आयोजित केलेल्या पाच दिवसांच्या मुलाखत प्रक्रियेद्वारे केली जाईल. या मुलाखतीसाठी उमेदवारांना त्यांच्या पात्रता पदवी गुणांच्या आधारे निवडलं जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना गुणवत्तेनुसार SSB साठी बोलावलं जाईल. यात यशस्वी झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणीही केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : 'काही तरी प्लॅनिंग सुरूय...' वडिलांना आधीच सावध केलं होतं; प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाचा मोठा दावा

Apple Pay आता भारतात सुरू; Axis Bankच्या कार्डधारकांना मिळणार सुविधा, जाणून घ्या कसं वापराचं

‘सारेगमप’चं शूटिंग संपवून ट्रेनने घरी निघाले, अन् पहिले पीरियड्स आले'; श्रेया घोषाल आठवण सांगत म्हणाली, 'वडिलांनी पॅड आणलं आणि..'

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

Uttarakhand: स्कूटी चालवून महिला कमावताहेत २० हजार रुपये! फ्लिपकार्ट, मिंत्रा ते ब्लिंकिट-स्विगीमध्ये संधी

SCROLL FOR NEXT