Indian Railway esakal
एज्युकेशन जॉब्स

दहावी उत्तीर्णांसाठी रेल्वेत 3 हजार जागा; परीक्षेशिवाय मिळणार 'नोकरी'

सकाळ डिजिटल टीम

भारतीय रेल्वेत (Indian Railway) दहावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झालीय.

Railway Recruitment 2021 : भारतीय रेल्वेत (Indian Railway) दहावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झालीय. रेल्वेत तब्बल 3 हजारांहून अधिक रिक्त जागांसाठी नुकतीच एक जाहिरात प्रसिध्द करण्यात आलीय. उत्तर रेल्वेच्या रेल्वे भरती सेलने (RRC NR) एकूण 3093 अप्रेंटिस पदांसाठी एक अधिसूचना जारी केलीय. या पदांसाठी इच्छुक उमेदवार, अधिकृत वेबसाइटवर rrcnr.org आपला ऑनलाइन अर्ज भरु शकतात. दरम्यान, 20 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण तपशीलासह अर्ज सबमिट करता येणार आहे.

महत्वाचे : या पदांसाठी इच्छुक उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी उत्तीर्ण केलेली असावी. या व्यतिरिक्त उमेदवाराकडे आयटीआय (ITI) प्रमाणपत्र देखील असणं आवश्यक आहे. या पदांकरिता वयोमर्यादा 15 ते 24 वर्षे निश्चित करण्यात आलीय. आपण आपल्या संपूर्ण माहितीसह rrcnr.org यावरती अर्ज करू शकता.

अर्ज फी : अर्जासाठी 100 रुपये शुल्क जमा करावे लागेल. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 20 सप्टेंबरपासून सुरू असून 20 ऑक्टोबरपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. दरम्यान, गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही, असंही रेल्वे विभागानं स्पष्ट केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Finance Manager Murder Case : ६ लाखांच्या कर्जासाठी फायनान्स मॅनेजरची हत्या; प्रेमी युगुलाचा धक्कादायक कट

Parent Care: खानगावमध्ये मातृ-पितृ सेवेला सलाम; दशक्रिया विधीत विजय बोंबले दांपत्याचा ‘उत्कृष्ट मातृ पितृ सेवा पुरस्कार’ देऊन गौरव

Duleep Trophy Final : इशान किशनचे दहावे शतक! मोहम्मद सिराजसह सर्व गोलंदाजांना चोप दिला, ४०० पारच्या दिशेने वाटचाल Video

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

नवरा असावा तर असा! 'स्वतः भांडी घासतात, किचनही साफ करतात'; पतीबद्दल बोलताना श्रेया घोषाल म्हणाली...'त्यांनी मला कधीच...'

SCROLL FOR NEXT