नववी प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालयाच्या अर्ज प्रक्रियेला प्रारंभ! 'या' तारखेपर्यंत करा अर्ज Canva
एज्युकेशन जॉब्स

नववी प्रवेशासाठी नवोदय विद्यालयाच्या अर्ज प्रक्रियेला प्रारंभ!

नववी प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालयाच्या अर्ज प्रक्रियेला प्रारंभ! 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

श्रीनिवास दुध्याल

नवोदय विद्यालय समिती, NVS ने लेटरल एंट्री स्कीम अंतर्गत नववीच्या वर्गात प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.

सोलापूर : जवाहर नवोदय विद्यालय समिती (Jawahar Navodaya Vidyalaya) ने लेटरल एंट्री स्कीम अंतर्गत नववीच्या वर्गात प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना नववीमध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे, त्यांनी एनव्हीएसची अधिकृत साईट navodaya.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या वर्गासाठी घेण्यात येणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणीसाठी नोंदणी प्रक्रिया 31 ऑक्‍टोबर 2021 पर्यंत आहे. शेवटच्या तारखेनंतर कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही. विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे की, या परीक्षेस फक्त तेच विद्यार्थी उपस्थित राहू शकतात, जे 2021-22 च्या शैक्षणिक (Education) सत्रादरम्यान सरकारी मान्यताप्राप्त शाळांमधून इयत्ता आठवीमध्ये शिकत आहेत.

इयत्ता नववीच्या प्रवेशासाठी असा करा ऑनलाइन अर्ज

सर्वप्रथम नवोदय विद्यालयाच्या अधिकृत साईट navodaya.gov.in वर जावे. त्यानंतर मेन पेजवर उपलब्ध जेएनव्ही वर्ग 9 प्रवेश 2021 चाचणी लिंकवर क्‍लिक करा. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, जिथे उमेदवारांना स्वतःची नोंदणी करावी लागेल किंवा खात्यात लॉग इन करावे लागेल. आता अर्ज भरा आणि अर्ज फी भरा. त्यानंतर एकदा सबमिट करा वर क्‍लिक करा. आता तुमचा अर्ज सबमिट झाला आहे. नंतर पुष्टीकरण पेज डाउनलोड करा आणि पुढील गरजेसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा.

9 एप्रिल 2022 ला होणार प्रवेश परीक्षा

इयत्ता नववीच्या प्रवेशासाठी निवड चाचणी 9 एप्रिल 2022 रोजी होणार आहे. ही परीक्षा संबंधित जिल्ह्याच्या जवाहर नवोदय विद्यालयात / NVS द्वारे वाटप केलेल्या इतर कोणत्याही केंद्रावर घेतली जाईल. परीक्षेचा कालावधी 2 तास 30 मिनिटे राहणार आहे. परीक्षेचे माध्यम इंग्रजी / हिंदी असेल आणि विद्यार्थ्यांना ओएमआर शीटमध्ये उत्तर द्यावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT